मुक्तपीठ टीम
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये ट्रेनी इंजिनीअर-१ या पदासाठी ५० जागा, प्रोजेक्ट इंजिनीअर-१ या पदासाठी ६१ जागा अशा एकूण १११ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २३ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण बंगळुरू आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ कॉम्प्युटर सायन्स या विषयात बीई/ बीटेक/ बीएससी इंजिनीअर २) ०६ महिने अनुभव
- पद क्र.२- १) इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ कॉम्प्युटर सायन्स या विषयात बीई/ बीटेक/ बीएससी इंजिनीअर २) ०२ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २८ किंवा ३२ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून १७७ रूपये शुल्क आकारले जाणार आणि पद क्र.२ साठी जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ४७२ रूपये शुल्क आकारले जाणार आहे. तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
शुल्क भरण्यासाठीची लिंक
https://www.onlinesbi.sbi/sbicollect/icollecthome.htm
अर्ज पाठविण्याचा पत्ता
एचआर मॅनेजर, प्रोटक्ट डेव्हलपमेंट अॅंड इनोव्हेशन सेंटर, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, प्रो. UR राव रोड, नागालँड सर्कल जवळ, जलहल्ली पोस्ट, बंगळुरू- ५६० ०१३, भारत
अधिक माहितीसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://bel-india.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://drive.google.com/file/d/1xIEmqSJC711-EBpr65CEoFoXUQpWeZrV/view
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1vegiw_rerQ8hXQ9oxVEOHuzIyjfnGIyz/view