मुक्तपीठ टीम
जागतिक मधुमेह दिन हा दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय मधुमेह प्राधिकरण या संस्थेद्वारे १९९१ मध्ये ही संकल्पना राबवण्यात आली. या आजाराबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. लोकांना या आजाराची माहिती देण्यासाठी दरवर्षी जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातो. मधुमेह हा हळूहळू विकसित होतो. यामध्ये रक्तातील साखरेमध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक वाढ दिसून येते.
जागतिक मधुमेह दिन का साजरा केला जातो?
- जागतिक आरोग्य संघटनेनुसार, २०१४ पासून सुमारे ४२२ दशलक्ष लोकांना मधुमेह झाला आहे.
- हा दिवस ११९१ मध्ये साजरा करण्यास सुरुवात झाली. . इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशन आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी लोकांमध्ये मधुमेहाविषयी जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.
- इन्सुलिनचा शोध लावणारे शास्त्रज्ञ सर फ्रेडरिक बॅंटिंग यांचा १४ नोव्हेंबर १९२२ हा जन्मदिन म्हणून यादिवशी हा दिन साजरा केला जातो.
- शरीरातील साखरेचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी इन्सुलिनची मोठी भूमिका असते.
जागतिक मधुमेह दिवसाचा प्रसार करण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रम आणि मधुमेह तपासणी शिबिर यांचे आयोजन केले जाते. तसेच विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जातात.
मधूमेह असणाऱ्यांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी?
- मधूमेह असणाऱ्यांनी डाएट चार्ट फॉलो करावा.
- नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण घ्यावे.
- तसेच, ३ ते ४ वेळा स्नॅक्स यामध्ये २-३ वेळा फळे खाऊ शकता. याशिवाय स्प्राउट्स, सूप आणि ओट्ससारखे काही आरोग्यदायी स्नॅक्सही घेता येतात.
- मधुमेहाच्या रुग्णांनी दिवसातून किमान ८ ते १० वेळा पाणी प्यावे. याशिवाय लिंबूपाणी, ताक आणि टोन्ड मिल्क हे लिक्विडमध्येही घेऊ शकतात.
हा एकमेव मोठा असंसर्गजन्य आजार आहे ज्याचा धोका जास्त लोकांमध्ये वाढत आहे.