मुक्तपीठ टीम
आज संपूर्ण देशात बालदिवस साजरा केला जात आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस हा बाल दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शाळा-महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते. पण पंडित नेहरू यांच्या जन्मदिनी बालदिवस का साजरा केला जातो? यामगाचा इतिहास आज जाणून घेऊया…
बालदिवसाचा इतिहास!!
- पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म अलाहाबाद येथे १४ नोव्हेंबर १८८९ रोजी झाला.
- पंडित नेहरू यांचे लहान मुलांवर अपार प्रेम होते.
- पंडित नेहरू नेहमी लहान मुलांमध्ये रमायचे, त्यामुळे मुलांनाही ते आपलेसे वाटायचे, आणि म्हणूनच त्यांना चाचा नेहरू म्हणूनही ओळखले जाते.
- पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्या एका प्रसिद्ध भाषणात म्हणाले होते, “आजची मुलं उद्याचा भारत घडवतील. आम्ही त्यांना जसे घडवू ते देशाचे भविष्य घडेल.
- नेहरू यांचे १९६४ साली निधन झाले आणि त्यांच्या स्मरणार्थ आणि त्यानां श्रद्धांजली म्हणून त्यांचा जन्मदिवस बालदिवस म्हणून साजरा करण्याचा ठराव संसदेने मंजूर केला.
- त्यांना गुलाब या फुलाचीही आवड होती.
- म्हणूनच त्याच्या कोर्टच्या खिशात नेहमी गुलाब असायचा.
- १९६४ पूर्वी भारतात २० नोव्हेंबरला बालदिवस साजरा केला जात होता.
जवाहरलाल नेहरू यांच्याविषयीच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत?
- पंडित जवाहरलाल नेहरू काश्मीरमधील पंडित घराण्यातील होते. त्यांना विजय लक्ष्मी पंडित (मोठी बहीण) आणि कृष्णा हुथीसिंग (लहान बहीण) नावाच्या दोन बहिणी होत्या.
- पंडित जवाहरलाल नेहरू यांना कधीही नोबेल पारितोषिक मिळाले नाही, जरी त्यांना १९५० ते १९५५ या काळात ११ वेळा नामांकन मिळाले. जवाहरलाल नेहरूंना त्यांच्या शांततेच्या कार्यासाठी मोठ्या प्रमाणात नामांकन देण्यात आले होते.
- १९०७ मध्ये ट्रिनिटी कॉलेजमध्ये लॉ ला प्रवेश घेतला. नेहरूंनी १९१० मध्ये , केंब्रिज विश्वविद्यालयातून न्याय शास्त्रातील शिक्षण पुर्ण केले.
- ऑगस्ट १९१२ मध्ये ते भारतात परतले आणि अलाहाबाद उच्च न्यायालयात वकीली सुरु केली.
- देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात पंडित जवाहरलाल नेहरूंना वेगवेगळ्या नऊ वेळा तुरुंगवास भोगावा लागला. एकूण, ब्रिटिशांनी नेहरूंना ३२५९ दिवस कैद केले होते.
- तुरुंगात असताना त्यांनी १९३५ मध्ये आत्मचरित्रही लिहिले. १९३६ मध्ये युनायटेड स्टेट्समध्ये प्रदर्शित झालेल्या “Toward Freedom” असे त्याचे नाव होते.
- नेहरू १९२९ मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांची मोठी भूमिका होती.
- सन १९२७ मध्ये संपूर्ण राष्ट्रीय स्वातंत्र्याचा प्रस्ताव देणारे ते पहिले होते आणि त्यांनी भारतीय नागरी सेवा (ICS) सह ब्रिटीश साम्राज्याशी भारतीयांना बंधनकारक असलेल्या सर्व संबंधांचा त्याग केला.
- नेहरू १९१६ मध्ये ऍनी बेझंटच्या होम रुल लीगमध्ये कार्यकर्ते होते.
- पंडित जवाहरलाल नेहरू यांना “आधुनिक भारताचे शिल्पकार” म्हणूनही ओळखले जाते.
- १९४७ साली जेव्हा भारत स्वतंत्र्य झाला, तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरुंना भारताचे पहिले पंतप्रधान बनवण्यात आले. त्यानंतर तीन वेळा सलग नेहरू हे पंतप्रधान पदावर विराजमान राहिले.
- पंडित नेहरू २७ मे १९६४ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले.