मुक्तपीठ टीम
अंतराळात उपग्रह आणि उपकरणे प्रक्षेपित करण्यासाठी भारतातील सर्वात वजनदार रॉकेट लॉंच व्हेईकल मार्क ३ म्हणजेच LVM3 ची क्षमता ४५० किलो इतकी वाढवण्यात आली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेना म्हणजेच इस्रोने क्रायोजेनिक इंजिन CE20 ची केलेली यशस्वी ठरली. हे इंजिन भारतातच विकसित करण्यात आले आहे.
इस्रोने ‘क्रायोजेनिक इंजिन CE20’ची केली यशस्वी चाचणी! LVM-3 रॉकेटला होणार फायदा
- इस्रोने सांगितले की प्रथमच थ्रस्ट लेव्हल २१.८ टन पर्यंत वाढवण्यात आली आणि हॉट टेस्ट करण्यात आली.
- हॉट टेस्ट म्हणजे इंजिन ऑपरेशनशी संबंधित सर्व पॅरामीटर्सची १००% चाचणी, ज्यामध्ये इंजिनची वास्तविक कार्यक्षमता मोजली जाते.
- चाचणी दरम्यान, इंजिन पहिल्या ४० सेकंदांसाठी २० टन थ्रस्ट स्तरावर कार्यरत होते.
- यानंतर थ्रस्ट कंट्रोल व्हॉल्व्हच्या सहाय्याने ते २१.८ टन करण्यात आले.
- इंजिनची चाचणी करताना आणि त्याची कार्यक्षमता सामान्य असल्याचे आढळले आणि इच्छित परिणाम प्राप्त झाले.
- इस्रोच्या म्हणण्यानुसार, या चाचणीमुळे उपग्रहांना अंतराळात नेण्याची LVM3 ची क्षमता वाढण्यास मदत होईल.
- ही वाढ ४५० किलोपर्यंत असू शकते.
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, जुन्या इंजिनच्या तुलनेत CE20 मध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये रॉकेटच्या जोरावर नियंत्रण ठेवणाऱ्या टीसीव्हीचा समावेश आहे.
तसेच, द्रव ऑक्सिजन आणि द्रव हायड्रोजन इंधन टर्बाइन एक्झॉस्ट केसिंग 3D प्रिंटरपासून बनवले गेले, जे इंजिनमध्ये प्रथमच स्थापित केले गेले.
‘LVM3’ तीन टप्प्यातील रॉकेट!
. LVM3 हे तीन टप्प्याचे रॉकेट आहे.
. जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट म्हणजेच जीटीओमध्ये ४ टन पर्यंतचे उपग्रह आणि उपकरणे हलवण्याची क्षमता आहे.
. जीटीओ समुद्रसपाटीपासून ३५,७८६ किमी उंचीवर असल्याचे मानले जाते.