Monday, June 9, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पॅडीला झालीय लगीनघाई!’वऱ्हाडी वाजंत्री’सह ११ नोव्हेंबरला बोहल्यावर!!

November 7, 2022
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Varhadi Vajantri

मुक्तपीठ टीम

लग्न हा भारतीय संस्कृतीत एक पवित्र सोहळा मानला जातो. ते केवळ दोन जीवांचे मिलन नसते, तर त्यांच्या अवतीभवती असलेल्या नातेवाईकांच्या ऋणानुबंधांचेही मिलन असते. मात्र लग्न सोहळा म्हटलं की मानापमान, रुसवे फुगवेही आलेच. लग्नात कोण, केव्हा आणि कश्यावरुन गोंधळ घालेल याचा काहीही नेम नसतो. त्यामुळे एकमेकांवर जीवापाड प्रेम करण्याऱ्या प्रेमी जीवांच्या मनात त्यांचे लग्न लागेपर्यंत सतत धाकधूक लागलेली असते. अशीच काहीशी धाकधूक आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता पॅडी कांबळेला लागल्याने तो लगीनघाई  करताना दिसतोय. त्याला त्याच्या नव्या लग्नाची जॅम चिंता आहे. नातेवाईकांच्या गोंधळाला आणि त्यांच्या रुसव्या फुगव्यांना तो पुरता घाबरून गेलाय. त्याला त्याच्या लग्नाची फार चिंता वाटू लागली आहे. या भीतीपोटी त्याने थेट पुढचं पाऊल उचललं असून लोकप्रिय अभिनेता व समाजसेवक मकरंद अनासपुरे आणि प्रख्यात विनोदी अभिनेते दिग्दर्शक विजय पाटकर यांच्या मदतीने ‘वऱ्हाडी वाजंत्री’ घेऊन ११ नोव्हेंबरला बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतला आहे.

Varhadi Vajantri

११ नोव्हेंबर हा दिवस कधी उजाडतोय आणि चिं. सौ. का. परी सोबत त्याचं लग्न कधी लागतंय असं त्याला झालंय. ‘वऱ्हाडी वाजंत्र्यां’च्या मानधनासह या लग्नाचा सर्व आर्थिक बोजा ‘स्वराज फिल्म प्रॉडक्शनतर्फे कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांसह अतुल राजारामशेठ ओहळ यांनी स्व:खुशीने उचलला आहे.

आपल्या विनोदी अभिनयाने रसिकांना पोट धरून हसवणाऱ्या विजय पाटकर यांनी त्यांच्या नव्या ‘वऱ्हाडी वाजंत्री’ या चित्रपटातही रसिकप्रेक्षकांना पोटधरून हसविण्याचेच काम केले  आहे. विजय पाटकरांच्या या चित्रपटात पॅडीच्या अभिनयानं सजलेला युवराज पहायला मिळणार आहे. आणि या युवराजचेच हे लग्न असून ‘परी’ म्हणजेच आपल्या सर्वांना हसविणाऱ्या हेमांगी कवी सोबत त्याची केमिस्ट्री जमली आहे. दोघांचं विनोदी गाणं सध्या विविध चॅनेल्सवर प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. ‘वऱ्हाडी वाजंत्री’  या चित्रपटात मकरंद अनासपुरे, मोहन जोशी, रिमा लागू, पंढरीनाथ कांबळे, हेमांगी कवी, विजय कदम, प्रिया बेर्डे, जयवंत वाडकर, आनंदा कारेकर, सुनील गोडबोले, पूर्णिमा अहिरे, गणेश रेवडेकर, प्रभाकर मोरे, प्रशांत तपस्वी, राजेश चिटणीस, जयवंत भालेकर, विनीत बोंडे, शिवाजी रेडकर, आशुतोष वाडेकर, शीतल कलाहपुरे, साक्षी परांजपे आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत.


Tags: good newsmuktpeethPaddy LaginghaiVarhadi VajantriVijay Patkarघडलं-बिघडलंचांगली बातमीपॅडी लगीनघाईमुक्तपीठवऱ्हाडी वाजंत्रीविजय पाटकर
Previous Post

ऐतिहासिक चित्रपटातून इतिहासाची मोडतोड – संभाजीराजे छत्रपती

Next Post

भारतातील पहिल्या फॉर्मुला ई रेसचा काउंटडाऊन सुरु! पहिली ई-प्रिक्स ११ फेब्रुवारी २०२३ ला हैदराबादमध्ये!!

Next Post
E-Prix

भारतातील पहिल्या फॉर्मुला ई रेसचा काउंटडाऊन सुरु! पहिली ई-प्रिक्स ११ फेब्रुवारी २०२३ ला हैदराबादमध्ये!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!