Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अंधेरीत मतदान कमी, पण नोंदणीकृत मतदारांपैकी ९१ टक्के ज्येष्ठ मतदारांनी केले घरूनच मतदान

November 5, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Andheri Bypoll ELelction

मुक्तपीठ टीम

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनानुसार राबविण्यात आलेल्या “घरून मतदान” या उपक्रमांतर्गत ‘अंधेरी पूर्व’ मतदारसंघातील ४३० मतदारांनी सहमती दर्शवली होती‌. यापैकी तब्बल ९१ टक्के मतदारांनी म्हणजेच ३९२ मतदारांनी घरून मतदान करून आपले लोकशाही विषयक कर्तव्य पार पाडले आहे, अशी माहिती अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील ‘अंधेरी पूर्व’ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रक्रियेअंतर्गत दि. ३ नोव्हेंबर २०२२ रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. यंदाच्या या निवडणुकीचे एक महत्त्वाचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे देशाच्या निवडणूक इतिहासात ‘घरुन मतदान’ हा उपक्रम राबविण्यात आला आहे. शारीरिक दृष्ट्या आव्हानात्मक परिस्थितीत असणाऱ्या व ८० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत घरुनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

देशभरात पहिल्यांदाच राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत ‘अंधेरी पूर्व’ मतदारसंघात करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत अधिक माहिती देताना प्रशांत पाटील यांनी सांगितले की, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील ८० वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या मतदारांची एक स्वतंत्र यादी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला तयार करण्यात आली होती. या यादीमध्ये साधारणपणे ७ हजार मतदारांची माहिती होती. या यादीतील सर्व मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांना घरून मतदान करण्याची सुविधा असल्याची माहिती देण्यासह या सुविधेंतर्गत नोंदणी करण्याचा पर्याय असल्याचे सांगण्यात आले होते. या पर्यायानुसार ४३० ज्येष्ठ मतदारांनी घरून मतदान या प्रक्रियेसाठी आपले नाव नोंदविण्याची सहमती दिली. त्यानंतर ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या ३ दिवसांच्या कालावधी दरम्यान ‘अंधेरी पूर्व’ मतदारसंघातील अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश असलेली ७ व्यक्तींची चमू या ज्येष्ठ नागरिकांच्या घरी गेली‌. घरी पोहचल्यानंतर या चमूद्वारे तात्पुरते मतदान केंद्र उभारण्यात आले. या तात्पुरत्या मतदान केंद्रात घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्तीने नाव नोंदविले आहे, त्या व्यक्तीने आपले मत हे ‘गुप्त मतदान’ पद्धतीने नोंदविले. ज्येष्ठ नागरिकांनी केलेले हे मतदान भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सीलबंद करून जमा करण्यात आले आहे.

या तपशिलानुसार ‘घरून मतदान’ या सुविधेंतर्गत ‘अंधेरी पूर्व’ मतदार संघातील ज्या ४३० ज्येष्ठ मतदारांनी नाव‌ नोंदविले होते, त्यापैकी ३९२ मतदारांनी घरून मतदान करत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. याचाच अर्थ या वर्गवारीतील मतदारांपैकी तब्बल ९१.१६ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे आणि मतदान प्रक्रियेत आपला उत्साहवर्धक सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली.


Tags: Andheri Bypoll Electionsअंधेरी पूर्व मतदारसंघअंधेरीत मतदान
Previous Post

राज्य सेवा (पूर्व) परीक्षा – २०२२ चा निकाल जाहीर; मुख्य परीक्षा २१,२२ व २३ जानेवारी, २०२३ रोजी

Next Post

CNG – PNG दरांचा भडका! गाडी चालवणं अधिकच महागलं…

Next Post
cng price down by rs 6 kg png by rs 3.50 in maharashtra

CNG - PNG दरांचा भडका! गाडी चालवणं अधिकच महागलं...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!