पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे या चार शहरांमध्ये ५ हजार ६४७ घरांसाठी सोडत काढली जाणाराय. ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू झालीय. या सोडतीत प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत बांधलेल्या पुणे जिल्ह्यातील म्हाळुंगे येथे ५१४ सदनिका, तळेगाव दाभाडे येथे २९६ सदनिका, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे ७७ सदनिका, सांगली येथे ७४ सदनिकांचा समावेश आहे.तसेच म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या माोरवाडी पिंपरी येथील ८७ सदनिका, पिंपरी वाघिरे (पुणे) येथील ९९२ सदनिका तर सांगली येथील १२९ सदनिकांचा देखील या सोडतीत समावेश आहे.
डिसेंबर, १० रोजी दुपारी ३ वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात होणार असून नोंदणीकृत अर्जदार सायंकांळी ६ वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तसेच या ऑनलाइन नोंदणीची ११ जानेवारी २०२१ ला सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदत असणार आहे. तर १२ जानेवारीला अर्ज सादर करवा लागेल आणि १३ जानेवारीला संबंधित बँकांच्या कार्यालयीन वेळेपर्यंत आरटीजीएस किंवा एमईएफटी च्या माध्यामातून अनामत रक्कमेचा भरणा अर्जदारांना करता येईल.
तसेच अधिक माहिती मिळण्यासाठी https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर जाऊन मिळवू शकता. तसेच २२ जानेवारी २०२१ रोजी सोडत कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.