मुक्तपीठ टीम
नागपूरमध्ये रविवारी ५० कोटी रुपयांचा पैशाचा पाऊस पाडतो असे आमिष दाखवून एका मुलीवर जादूटोणा करण्याच्या बहाण्याने दबाव आणल्याच्या आरोपाखाली पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की आरोपींविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकी गणेश खापरे (२०), दिनेश महादेव निखारे (वय २५), रामकृष्ण दादाजी म्हस्कर (४१), विनोद जयराम मसराम (४२) आणि डीआर उर्फ सोपान हरिभाऊ कुमरे (३५) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, मुलीने २६ फेब्रुवारी रोजी एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती की काही दिवसांपूर्वी एका आरोपीने तिला सांगितले होते की तिने त्याने सांगितील तसे केल्यास ती श्रीमंत होईल. आकाशातून ५० कोटी रुपयांचा पाऊस पडेल.
महाराष्ट्र नरबळी इतर अमानुष अनिष्ट व जादूटोणा प्रतिबंधक कायदा
या अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने मुलीला निर्वस्त्र होण्यास सांगितले होते, यामुळे तिला ते संशयास्पद वाटले आणि तिने त्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरवात केली. असे असूनही, आरोपींनी मुलीवर दबाव कायम ठेवला, त्यानंतर पीडित मुलीने पोलिसांत तक्रार दिली. लकदरगंज पोलिसांनी जादूटोणा प्रतिबंधक कायदा, पॉक्सो व इतर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.