मुक्तपीठ टीम
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीओरडी) च्या सेंटर फॉर पर्सनल टॅलेंट मॅनेजमेंट (CEPTAM) ने स्टेनोग्राफरसह विविध पदांसाठी भरती जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, CEPTAM ने स्टेनोग्राफर ग्रेड I, कनिष्ठ तंत्रज्ञ अधिकारी, स्टेनोग्राफर ग्रेड II, प्रशासकीय सहाय्यक A, स्टोअर असिस्टंट A, सुरक्षा सहाय्यक A, वाहन ऑपरेटर A, फायर इंजिन ड्रायव्हर A आणि फायरमनच्या पदांसाठी १०६१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार ७ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
- ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱा उमेदवार: हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी किंवा हिंदी/इंग्रजी पदवी + हिंदी/इंग्रजी ट्रांसलेशन डिप्लोमा आणि २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
- स्टेनोग्राफर ग्रेड-I: पदवीधर, कौशल्य चाचणी तसचे डिक्टेशन करण्याचे कौशल्य लिप्यंतरण संगणकावर 40 मिनिटे (इंग्रजी) करता आले पाहिजे.
- स्टेनोग्राफर ग्रेड-I: १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक डिक्टेशन आणि लिप्यंतरण करण्याचे कौशल्य असणे.
- अॅडमिन असिस्टंट ‘अ’: १२ वी उत्तीर्ण आणि संगणकावर इंग्रजी टायपिंग आले पाहिजे.
- अॅडमिन असिस्टंट ‘अ’: १२ वी उत्तीर्ण आणि संगणकावर हिंदी टायपिंग करता आले पाहिजे.
- स्टोअर असिस्टंट ‘A’: १२वी उत्तीर्ण आणि संगणकावर इंग्रजी टायपिंग येणे आवश्यक आहे.
- स्टोअर असिस्टंट ‘A’: १२वी उत्तीर्ण (ii) संगणकावर हिंदी टायपिंग आले पाहिजे.
- सिक्योरिटी असिस्टंट ‘A’: १२वी उत्तीर्ण
- व्हेईकल ऑपरेटर ‘A’: १०वी उत्तीर्ण आणि दोन किंवा तीनचाकी वाहनचालक परवाना + हलके व अवजड वाहनचालक परवाना तसेच ३ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
- फायर इंजिन ड्राइव्हर ‘A’: १०वी उत्तीर्ण, दोन किंवा तीनचाकी वाहनचालक परवाना+ हलके व अवजड वाहनचालक परवाना असणे आवश्यक आहे.
- फायरमन : १०वी उत्तीर्ण
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते ३० वर्षांदरम्यान असावे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना १०० रुपये तर एससी/ एसटी/ ईएसएस/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी डीआरडीओच्या अधिकृत वेबसाइट https://www.drdo.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://www.drdo.gov.in/ceptm-advertisement/482
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1570Rk5WPw1q_oFLE40UoNYCo6QFj0-UF/view