मुक्तपीठ टीम
मोहिते वडगाव हे गाव कडेगाव तालुक्यातील ३५०० टक्के लोकसंखेचे गाव,ताकारी योजनेच्या पाण्यामुळे गाव १००% बागायत गावामध्ये सधनता आली आहे.दळणवळणासाठी पलूस,विटा,इस्लामपूर,कडेगाव अशा लगतच्या शहरांशी पक्क्या रस्त्यांनी हे गाव जोडले आहे.सांगली जिल्ह्यामध्ये सांगली पासून ५० किमी अंतरावर आहे.सुंदर असा निसर्ग असा जवळच सागरेश्वर अभयारण्य आहे.गावामध्ये चांगली सुबतता आहे.मात्र गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावाने मोठ्या संकटाचा सामना केला,गावाचे सरपंच विजय मोहिते यांनी या काळात अतिशय जागरूकतेने काम केले आहे.प्रशासनाशी समन्वय ठेवला व आपल्या गावाला वाचवल.दरम्यान लॉकडाऊनमुळे शाळा,महाविद्यालय बंद झाले.मुलांचे शिक्षण ऑनलाईन सुरु झाले.कोरोनाचा काळ संपत आला मात्र शाळा सुरु होण्यासाठी वेळ लागला.मुलांची वाचनाची,लेखनाची सवय पूर्ण पणे बंद झाली.त्यांच्या हाती मोबाईल आला व त्याच्या दूरगामी परिणाम मुलांच्यावर झाला.हे सर्वजन पालक,शिक्षण पाहत होते.मग त्यावर करायच काय,त्यावर उपाय काय करायचा सर्वांच्या समोर मोठा प्रश्न होता.
स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त गावामध्ये अनेक उपक्रम सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.त्यामध्ये दि.१४/०८/२०२२ रोजी महिलांची ग्रामसभा आयोजित केली होती.त्यावेळी गावातील महिला भगिनी यांनी ग्रामसभेत महत्वाचा प्रश्न ग्रामसभेचे अध्यक्ष मा.सरपंच यांनी विचारला.मुल अभ्यास करत नाहीत या विषयवार चर्चा झाली सर्वांनी विचार केला.गावातील मुल हि देशाच,गावच पर्यायाने कुटुंबाच भवितव्य आहे.त्यांनी अभ्यास केला पाहिजे.शेवटी सर्वांच्या चर्चेतून निकष झाला.हे सर्व मोबाईल आणि टी.व्ही मुळे होत आहे.त्यामुळे गावाचे सरपंच विजय मोहिते यांनी सर्वाना विश्वासात घेऊन निर्णय घेतला.दि.१५/०४/२०२२ स्वतंत्र दिना पासून गावामध्ये साय.७ ते ८.३० या वेळेत गावातील टी.व्ही.मोबाईल बंद राहतील.या निर्णयावर सर्वांनी साथ दिली.व अंमलबजावणी सुरु केली.गावातील मंदिरावर सुचणे साठी सायरन बसविला.व तो वाजला कि गावातील सर्व मुले अभ्यासाला बसतात.व मोबाईल व टी.व्ही गावातील ग्रामस्थ बंद करतात.हळहळू याची चर्चा आस-पासच्या गावात सर्वत्र पसरली.न्यूज पेपर,सोशल मिडीया यांनी प्रत्यक्ष येऊन दखल घेतली.सर्वांनी या निर्णयाचे कौतुक केले.आज हा डिजिटल लॉकडाऊनचा उपक्रम देशात न्हवे तर जगातील अनेक देशात पोहचला आहे.अनेक लोक दररोज गावाला भेट देऊन माहिती घेत आहेत.गावाचे सरपंच श्री.विजय मोहिते आणि त्यांचे सर्व ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी,कार्यकर्ते,महिला,शिक्षक,विद्यार्थी यांच हे यश आहे इतकच….