मुक्तपीठ टीम
मागेच आपण केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशातील उज्जैनचे खासदार अनिल फिरोजिया यांच्यातील एका चॅलेंजविषयी ऐकलं असालचं. अनिल फिरोजिया यांनी नितीन गडकरी यांचे चॅलेंज स्वीकारून आपले वजन ३२ किलोने कमी केले. फेब्रुवारी २०२२मध्ये नितीन गडकरींनी मंचावरच फिरोजियांना वजन कमी करण्याचे चॅलेज दिले होते. या वेळी ते म्हणाले की, ते जेवढे वजन कमी करणार, त्या प्रत्येक किलो वजनावर आपण विकासकामांसाठी १ हजार कोटी रुपये देऊ. मंत्र्याला दिलेल्या आश्वासनानुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सध्या त्यांच्या लोकसभा मतदारसंघासाठी २,३०० कोटींचा विकास निधी मंजूर केला आहे.
नितिन गडकरींचे अनिल फिरोजियांना वजन कमी करण्याचे चॅलेंज!
- फिट इंडिया मोहिमेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती.
- या प्रचारादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उज्जैनमध्ये एका कार्यक्रमाला पोहोचले होते.
- येथे त्यांनी खासदार अनिल फिरोजिया यांना वजन कमी करण्याचे चॅलेंज दिले आणि खासदार फिरोजिया यांनी हे चॅलेंज स्वीकारून ३२ किलो वजन कमी केले.
- अवघ्या तीन महिन्यांत त्यांनी १२ किलो वजन कमी केले. चार महिन्यात २० किलो वजन कमी करत ३२ किलो वजनाची माहिती केंद्रीय मंत्र्यांना पाठवली.
- त्यांनी सांगितले की, जेव्हा त्यांना गडकरींनी हे चॅलेंज दिले होते, तेव्हा त्यांचे वजन १३० किलो होते. पण आता त्याचे वजन ९८ किलो आहे.
गडकरींनीही दिलेले आश्वासन पूर्ण केले
- फिरोजिया यांनी जेव्हा वजन केल्याची माहिती नितीन गडकरी यांना दिली तेव्हा त्यांना अत्यंत आनंद झाला.
- खासदार फिरोजिया यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री गडकरी यांनीही आपले आश्वासन पूर्ण केले आणि उज्जैन लोकसभा मतदारसंघातील विकास प्रकल्पांसाठी ३२ हजार कोटी रुपये देण्याचे सांगितले.
- त्यापैकी २,३०० कोटींचा विकास निधी त्यांनी मंजूर केला आहे.
- उर्वरित रकमेचा निधीही त्यांच्या मतदारसंघात लवकरच दिला जाणार आहे.
- या कामगिरीमुळे ते देशातील सर्वात महागडे खासदार बनल्याचे त्यांनी सांगितले.
फिरोजिया यांनी त्यांच्या मतदारसंघाच्या विकासापोटी चॅलेंज स्वीकारले…
- फिरोजिया यांनी सांगितले की, “त्यांच्या क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी हे चॅलेंज स्वीकारले होते.
- पण हे कसं पूर्ण करायचं हीच चिंता होती.
- वजन कमी करण्यात पत्नी आणि मुलीने पूर्ण सहकार्य केले.
- यादरम्यान त्याच्या आहाराची काळजी घेण्यात आली आणि नियमित व्यायाम केले.
- भविष्यात आणखी थोडे वजन कमी करून उज्जैनसाठी आणखी विकास निधी प्राप्त करण्याचा मानस फिरोजिया यांनी व्यक्त केला आहे.
फिरोजियांचा डाएट प्लॅन कसा होता?
- फिरोजिया यांनी वजन कमी आयुर्वेदिक डायट चार्ट फॉलो केला.
- सकाळी साधा नाष्टा, दुपारी व रात्रीच्या जेवणात सॅलेड व एक वाटी हिरव्या भाज्या खात असल्याचे त्यांनी सांगितले.
- तसेच गव्हाच्या पोळ्या बाळगुन त्यांनी मिश्र धान्याच्या पोळ्या आहारात समाविष्ट केल्याचेही त्यांनी सांगितले.
- हारात गाजर सूप व ड्राय फ्रुटचा समावेश केल्याचेही ते म्हणाले.