मुक्तपीठ टीम
येत्या २७ ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या, ७६व्या पायदळ दिनाच्या वर्धापनदिनानिमित्त, पायदळातील सैनिक (इन्फंट्री फ्रॅटर्निटी)”इन्फंट्री डे बाइक रॅली २०२२” आयोजित करत आहे, ज्यामध्ये एकाच वेळी सर्व प्रमुख दिशांना जाणाऱ्या चार बाइक रॅलींचा समावेश आहे; ज्यात शिलाँग (मेघालय), वेलिंग्टन (तामिळनाडू), अहमदाबाद (गुजरात) आणि जम्मू (जम्मू आणि काश्मीर) यांचा समावेश आहे. १६ ऑक्टोबर २०२२ निघणाऱ्या या बाईक रॅलीज आसेतूहिमाचल फिरतील आणि पायदळ दिनाच्या दिवशी (“इन्फंट्री डे”) राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे त्यांची पूर्ती होईल.
दहा बाईकर्सचा समावेश असलेला प्रत्येक गट, पायदळाच्या ‘एस्प्रिट-डी-कॉर्प्स’चे प्रदर्शन करण्यासाठी एकूण ८ हजार किमीचा प्रवास आपल्या बाइक्स वरून करतील.सर्व दिशांना असा प्रवास करण्यामागील कल्पना केवळ पायदळाचा आत्मा आणि साहस यांचे प्रदर्शन करणे हा नसून यानिमित्ताने देशवासियांमधे राष्ट्रीय ऐक्यभावना निर्माण करणे हा देखील आहे.
पायदळातील सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या शौर्याला आणि बलिदानाला आदरांजली वाहण्यासाठी, तसेच त्या सर्वांशी असलेल्या संपर्काचे नूतनीकरण करण्यासाठी “बायोनेट बाइकर्स” वीर महिला, दिग्गज,छात्र सेनेचे विद्यार्थी (NCC कॅडेट्स), शाळांतील विद्यार्थी आणि स्थानिक लोकांशी संवाद साधतील.
शिलाँगमधील आसाम रेजिमेंट, अहमदाबाद येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट, उधमपूर येथील जम्मू आणि काश्मीर लाइट इन्फंट्री रेजिमेंट आणि वेलिंग्टन येथील मद्रास रेजिमेंट ह्या या बाइकर गटांचे नेतृत्व करणार आहेत.