मुक्तपीठ टीम
गुजरात निवडणुकीच्या तारखा दिवाळीनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, त्या निवडणुकीत नेमकं काय होणार यावर अंदाज बांधण्याचं काम जोरात सुरु आहे. गुजरातच्या लोकसंख्येच्या सुमारे आठ टक्के असणाऱ्या दलित मतदारांचा कल नेमका कोणत्या पक्षाकडे असेल, यावरही त्या राज्यातील सत्तेचं समीकरण ठरणार आहे.
गुजरात, सत्ता आणि दलित मतदार!
- लोकसंख्येतील प्रमाणानुसार, दलित मतदार हे राज्यातील प्रभावशाली समुदाय नाहीत.
- मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारांची मतं ही महत्वाची ठरणार आहेत.
- दलित मते ही सत्ताधारी भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि आम आदमी पक्षात विभागली जातील.
- एकूण १८२ जागांपैकी अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या १३ जागांव्यतिरिक्त दलित मतदार राज्यातील इतरही काही जागांवर प्रभाव टाकू शकतात.
- त्यामुळेच सर्व राजकीय पक्ष दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करणं स्वाभाविकच मानलं जात आहे.
आजवर काय घडलं?
- १९९५पासून अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या १३ जागांपैकी बहुतांश जागा भाजपने जिंकल्या आहेत. २००७ आणि २०१२ मध्ये यापैकी ११ आणि १० जागा जिंकल्या होत्या, तर कॉंग्रेसने दोन आणि तीन जागा जिंकल्या होत्या.
- २०१७ मध्ये भाजपला फक्त सात जागा जिंकता आल्या होत्या, तर कॉंग्रेसने पाच जागा जिंकल्या होत्या.
- एक जागा काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवाराने जिंकली.
- दलित तरुण मतदारांचा कलही बरंच काही ठरणार आहे.
दलित समाजाच्या धार्मिक गुरुंना भाजपा आपल्याकडे वळवणार
- दलित समाजासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांची प्रसिद्धी करण्याबरोबरच झांझरका, रोसरा या दलित समाजाच्या धार्मिक स्थळांच्या प्रमुखांनाही भाजपा आपल्या बाजूने वळवत आहे.
- २०१७ मध्येही दलित समाजाने भाजपाला पाठिंबा दिला होता आणि भाजपाला विश्वास आहे की २०२२ मध्येही त्यांना त्यांचा पाठिंबा मिळेल.
काँग्रेसचे अधिक दलित मतदारांच्या जागांवर खास लक्ष!
- काँग्रेस १० टक्के किंवा त्याहून अधिक दलित लोकसंख्या असलेल्या जागांवर विशेष लक्ष देत आहे.
- ते म्हणाले, काँग्रेस केवळ राखीव जागांपर्यंत मर्यादित न राहण्याची बहुधा ही पहिलीच वेळ आहे.
- १० टक्क्यांहून अधिक दलित मतदार असलेल्या सुमारे ४० जागा आम्ही ओळखल्या आहेत.
आप सांगतोय बाबासाहेबांचा वारसा!
- आप हा नवा स्पर्धक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा सांगत सफाई कामगार, दीनदुबळ्या वर्गावर खास लक्ष देत आहे.
- आम आदमी पक्षाच्या वाढत्या प्रभावामुळे दलित मतांचे तीन हिस्से होतील.