मुक्तपीठ टीम
दिवाळीचा सण अगदीच काही दिवसांवर आला आहे. दिवाळीच्या तयारीसाठी बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहेत. सणासुदीचे दिवस सुरु आहेत आणि उद्या रविवारही आलाय तर उद्या बरेच लोक खरेदीसाठी घराबाहेर पडतील. पण मग घराबाहेर पडण्याआधी रेल्वेचे रविवारचे मेगाब्लॉकचे नियोजनही पाहा. रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेने याबाबत माहिती दिली आहे.
मध्य रेल्वे
स्थानक- माटुंगा ते ठाणे
मार्ग- अप आणि डाउन धिम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
परिणाम- यावेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.१८ या वेळेत सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील.
या सेवा शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाणे या स्थानकांवर उशिराने धावतील.
पश्चिम रेल्वे
स्थानक- मरीन लाईन्स ते माहिम सकाळी १०.३५ ते सायंकाळी १५.३५ या कालावधीत जंबो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
परिणाम- ब्लॉक कालावधीमध्ये सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील सेवा मरीन लाईन्स आणि माहिम स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे या वळवलेल्या गाड्या महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकावर थांबणार नाहीत. डाऊन दिशेतील सर्व धीमे सेवा लोअर परळ आणि माहीम जंक्शनकडे वळवल्या जातील.
हार्बर रेल्वे
स्थानक- पनवेल -वाशी
मार्ग- अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत मेगाब्लॉक असेल.
परिणाम – पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.