मुक्तपीठ टीम
निवडणूक आयोगाने शुक्रवारी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. हिमाचलमध्ये १२ नोव्हेंबरला मतदान होणार असून ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या वेळापत्रकाच्या घोषणेसोबतच मुख्य निवडणूक आयुक्तांनी डोअरस्टेप व्होटिंग या नावाने सुरू केलेल्या नव्या सुविधेचीही माहिती दिली. या सुविधेअंतर्गत तुम्ही घरबसल्या मतदान करू शकाल.
घरात बसूनही मतदान शक्य!
- मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, वृद्ध, अपंग, ८० वर्षांवरील कोरोनाबाधित मतदार घर बसल्या मतदान करू शकतील.
- यासाठी अशा मतदारांना फॉर्म १२-डी देण्यात येणार आहे.
- गेल्या निवडणुकीत काही ठिकाणी घरून मतदान करण्याची सुविधा देण्यात आली होती.
- त्यानंतर काही लोकांनी घरून मतदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
- त्यादृष्टीने यावेळी घरोघरी मतदानाची व्हिडिओग्राफीही करण्यात येणार आहे.
निवडणुकीसाठी आयोगाची विशेष तयारी-
- स्वतंत्र, निष्पक्ष निवडणुकांसाठी आयोग कटिबद्ध असल्याचे निवडणूक आयुक्तांनी सांगितले.
- मतदारांना आरामात मतदान करता यावे, तरुण व वृद्ध मतदार बूथपर्यंत पोहचावे यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे.
- खोट्या बातम्या आणि अफवा पसरवणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येणार.
- सीमा सील राहतील.
- संध्याकाळी ६ नंतर रोख बंदीची कोणतीही हालचाल होणार नाही.
- यासोबतच एका नव्या सुविधेबाबतही निवडणूक आयुक्तांनी माहिती दिली.
- ते म्हणाले की, मतदान झालेल्या राज्यांमध्ये नावनोंदणीच्या दिवसापर्यंत नवीन मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करता येतील.
असं केलं जाईल घर बसल्या मतदान-
- घर बसल्या मतदानाबाबत निवडणूक आयुक्त म्हणाले की, देशात ८२ लाख दिव्यांग मतदार आहेत.
- जर ते बूथवर येऊ शकत असतील तर ते चांगलेच नाहीतर त्यांना १२-डी फॉर्म दिला जाईल.
- हे अर्ज भरलेल्या मतदारांचे मत घेण्यासाठी निवडणूक अधिकारी त्यांच्या घरी येणार आहेत.
- तसेच, निष्पक्षतेच्या उद्देशाने, तेथील उमेदवाराच्या एजंटला डोअर स्टेप मतदानाची आगाऊ माहिती दिली जाईल. मतदानाच्या वेळी उमेदवाराचा एजंट देखील उपस्थित राहू शकतो.