मुक्तपीठ टीम
भारतीय रेल्वेने आपल्या संपूर्ण ब्रॉडगेज मार्गांचे विद्युतीकरण करण्याच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा आरंभ केला असून त्यामुळे अधिक चांगल्या इंधन ऊर्जेचा वापर होण्याबरोबरच अतिशय मौल्यवान अशा परकीय चलनात बचत देखील होणार आहे.
भारतीय रेल्वेने आर्थिक वर्ष २०२२-२३ या कालावधीत , सप्टेंबर २०२२ पर्यंत, ८५१ मार्ग किलोमीटर (RKMs) विद्युतीकरणाचे उद्दिष्ट गाठले आहे. जे आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या त्याच कालावधीतील ५६२ मार्ग किलोमीटर (RKM) च्या तुलनेत ५१.४ टक्क्यांनी अधिक आहे. विद्यमान आर्थिक वर्षात रेल्वेने ६५०० मार्ग किलोमीटर (RKMs) विद्युतीकरणाचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे.
Indian Railways achieves 81.51% electrification of the total Broad Gauge network.
With this, Indian Railways is steadily moving towards achieving Net Zero Carbon Emission by 2030.
Read more : https://t.co/pPECBrbeYO pic.twitter.com/rGlszwJozE
— Darshana Jardosh (@DarshanaJardosh) October 14, 2022
२०२१-२२ या वर्षात भारतीय रेल्वेने ६,३६६ मार्ग किलोमीटर (RKMs) विद्युतीकरणाचे विक्रमी उद्दिष्ट पूर्ण केले आहे, याचा आवर्जून उल्लेख करायला हवा. त्यापूर्वीचे सर्वोच्च विद्युतीकरण २०२०-२१ वर्षात 6,015 मार्ग किलोमीटर इतके होते.
दिनांक ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत,भारतीय रेल्वेच्या ब्रॉडगेज मार्गांच्या नेटवर्कच्या ६५,१४१ मार्ग किलोमीटर (RKM) पैकी (कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि KRCL सह), ५३,०९८ किलोमीटर ब्रॉडगेज मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे, जे एकूण ब्रॉडगेज मार्ग नेटवर्कच्या ८१.५७% आहे.
१००% विद्युतीकरण मोहिमेच्या दिशेने वाटचाल : २०३०पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जक बनण्याचा रेल्वेचा प्रयत्न.