मुक्तपीठ टीम
भारतात इलेक्ट्रिक वाहने एका पाठी एक लाँच होत आहेत. भारतासह इतर देशातल्या कंपनीही भारतात त्यांच्या नव नवीन कार लाँच करत आहे. चिनी कंपनी बी वाय डी ही आपली नवीन ईव्ही भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने ११ ऑक्टोबर रोजी नवीन इलेक्ट्रिक वाहन देशात लाँच केली आहे. भारतीय बाजारात एम जी, ह्युंदाई, टाटा आणि महिंद्राचे ईव्ही पर्याय आधीपासूनच सक्रिय आहेत.
- बीवायडी अट्टो ३ ईव्ही ११ ऑक्टोबर रोजी भारतीय बाजारपेठेत लाँच होत आहे.
- कंपनीच्या नवीन ईव्हीची डिलिव्हरी २०२३ च्या सुरुवातीला सुरू होण्याची अपेक्षा आहे.
- भारतीय बाजारपेठेतील हे कंपनीचे दुसरे उत्पादन आहे.
- यापूर्वी कंपनीने ई एमपीवी सादर केली होती. नवीन ईव्हीमध्ये ४९.९२ केडब्ल्यूएचचा ब्लेड बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो.
- ही एका पूर्ण चार्जवर ३४५ किमीची श्रेणी मिळवू शकते.
- कंपनी या ईव्हीच्या विस्तारित श्रेणीसह एक प्रकार देखील देऊ शकते.
- ज्यामध्ये ६०.४९ केडब्ल्यूएचची मोठी बॅटरी मिळेल.
- ही एका चार्जमध्ये ४२० किमी पर्यंतची रेंज देऊ शकते.
- त्याची एक्स-शोरूम किंमत सुमारे ३० लाख रुपये असू शकते.
भारतातील इतर ईव्ही…
एमजी झेडएस ईव्ही
- एमजी झेडएस ईव्ही एक्साइट आणि एक्सक्लुझिव्ह अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.
- या कारमध्ये ५०.३ केडब्ल्यूएचचा बॅटरी पॅक उपलब्ध आहे.
- ही कार एका पूर्ण चार्जवर ४६१ किमीची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते.
- या इलेक्ट्रिक कारमधील मोटर १७४ बीएचपी आणि २८० न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते.
- एमजीची ही ईव्ही ८.५ सेकंदात शून्य ते १०० किमी प्रतितास वेग गाठू शकते.
- गाडीची एक्स-शोरूम किंमत २२.५८ लाख रुपयांपासून सुरू होते.
- त्याच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत २६.६० लाख रुपये आहे.
ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक
- ह्युंदाईची कोना इलेक्ट्रिक देखील बीवायडीच्या ईव्हीला आव्हान देईल.
- दक्षिण कोरियाच्या कार कंपनीच्या या ईव्हीची एक्स-शोरूम किंमत २३.८४ लाख रुपये आहे आणि त्याच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत २४.०२ लाख रुपये आहे.
- ही ईव्ही एका चार्जवर ४५२ किमी पर्यंत चालवता येते.
- ही कार केवळ ९.७ सेकंदात शून्य ते १०० किमी प्रतितास वेग गाठते.
- कारला इको, कम्फर्ट आणि स्पोर्ट असे तीन ड्राइव्ह मोड आहेत.
- या कारच्या बॅटरीवर आठ वर्षे किंवा एक लाख ६० हजार किलोमीटरची वॉरंटी आहे.
टाटा नेक्सॉन ईव्ही
- टाटाच्या नेक्सॉन ईव्हीची जेट एडिशन बीवायडी कारला आव्हान देऊ शकते.
- नेक्सॉनला जेट एडिशन तसेच ईव्ही प्राईम, ईव्ही मॅक्स आणि डार्क एडिशन पर्याय आहेत.
- जेट एडिशनसह नेक्सॉनची एक्स-शोरूम किंमत रु.१७.५० लाख पासून सुरू होते.
- त्याच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत २०.०४ लाख रुपये आहे.
- टाटाच्या या ईव्हीमध्ये ४०.५ केडब्ल्यूएचची लिथियम-आयन बॅटरी वापरली गेली आहे.
- एका पूर्ण चार्जवर याला ARAI-प्रमाणित श्रेणी ४३७ किमी मिळते.
- यात १४३ बीएचपी आणि २५० न्यूटन मीटर टॉर्क मिळतो.
- ही कार ९ सेकंदात शून्य ते १०० किमी प्रतितास वेग पकडते.
महिंद्रा एक्सयूव्ही ४००
- एक्सयूव्ही ४०० इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये पीएसएम इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे.
- ज्यामुळे १४७ हॉर्सपॉवरसह ३१० न्यूटन मीटरचा टॉर्क निर्माण होतो.
- महिंद्राच्या एक्सयूव्ही ४०० चा टॉप स्पीड १५० केएमपीएच आहे.
- या ईव्हीमध्ये ड्रायव्हिंगचे तीन पर्याय उपलब्ध आहेत.
- एक्सयूव्ही ४०० इलेक्ट्रिक ८.३ सेकंदात शून्य ते १०० किमी प्रतितास वेग वाढवू शकते.
- महिंद्राने या ईव्हीमध्ये ३९.४ केडब्ल्यूएचची बॅटरी दिली आहे.
- ही बॅटरी आयपी६७ रेटिंगसह येते आणि ती वॉटर आणि डस्ट-प्रूफ आहे.
- एका चार्जवर त्याची ड्रायव्हिंग रेंज ४५६ किमी पर्यंत आहे.