मुक्तपीठ टीम
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत म्हणजेच एनसीईआरटीत प्राध्यापक या पदासाठी ३९ जागा, सहयोगी प्राध्यापक या पदासाठी ९७ जागा, सहायक प्राध्यापक या पदासाठी १५३ जागा, ग्रंथपाल या पदासाठी ०१ जागा, सहाय्यक ग्रंथपाल या पदासाठी ०२ जागा अशा एकूण २९२ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २८ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) एमए/ पीजी २) पीएचडी
- पद क्र.२- १) ५५% गुणांसह एमए/ एमएड/ पीजी २) पीएचडी
- पद क्र.३- १) ५५% गुणांसह एमए/ एमएड/ पीजी २) एनईटी
- पद क्र.४- १) ५५% गुणांसह ग्रंथालय विज्ञान/ माहिती विज्ञान/ दस्तऐवजीकरण विज्ञानात पदव्युत्तर पदवी २) पीएचडी ३) १० वर्षे अनुभव
- पद क्र.५- १) ५५% गुणांसह ग्रंथालय विज्ञान/ माहिती विज्ञान/ दस्तऐवजीकरण विज्ञानात पदव्युत्तर पदवी २) एनईटी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय एनसीईआरटी/ यूजीसी/ जीओआयच्या नियमांनुसार असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या अधिकृत वेबसाइट https://ncert.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://ncertrec.samarth.edu.in/
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1rSATCpJXDqkH8-103xJHirswSCldL4x8/view