मुक्तपीठ टीम
हिरो मोटोकॉर्पने त्यांची ‘हिरो विडा इलेक्ट्रिक स्कूटर’ भारतात लॉंच केली आहे. हिरो विडा इलेक्ट्रिक स्कूटर व्ही १ प्रो आणि व्ही १ प्लस या दोन व्हेरिएंटमध्ये आणण्यात आली आहे. हिरो मोटोकॉर्पने आज प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉंच केली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात विडा नावाने लॉंच करण्यात आली आहे. ही स्कूटर पूर्ण लोडेड इलेक्ट्रिक स्कूटर आहे.
हिरो विडा: काय आहेत फिचर्स?
- विडा इलेक्ट्रिक स्कूटर आधुनिक फिचर्ससह सुसज्ज आहे.
- कंपनी दोन्ही स्कूटरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कीलेस कंट्रोल, रिव्हर्स मोड, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, सेफ्टी अलार्म, क्रूझ कंट्रोल आणि इतर अनेक फिचर्ससह एक मोठा ७-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले देत आहे.
- या स्कूटरमध्ये ७ इंची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, एलईडी इल्युमिनेशन, क्रूझ कंट्रोल, कीलेस कंट्रोल, एसओएस आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी यासारखे फिचर्स दिले आहेत.
- या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये इको, राइड स्पोर्ट आणि कस्टम असे तीन राइडिंग मोड देखील देण्यात आले आहेत, ज्यामुळे तुमचा ड्रायव्हिंगचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे.
कंपनी आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर चार्ज करण्यासाठी चार्जिंग नेटवर्क देखील तयार करत आहे, जे विडा इकोसिस्टमचा एक भाग असेल. विडा इकोसिस्टममध्ये, कंपनी तिच्या इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांसाठी खास डिझाइन केलेले चार्जिंग नेटवर्क, सर्व्हिस प्लॅटफॉर्म आणि बरेच काही यासह प्रदान करेल.
हिरो विडा बॅटरी क्षमता
- हिरो विडामध्ये वापरण्यात आलेल्या बॅटरी पॅकवर नजर टाकली तर कंपनीने यामध्ये एक मोठा बॅटरी पॅक वापरला आहे.
- या बॅटरीमध्ये एका चार्जमध्ये १६५ किमीपर्यंतची रेंज देण्याची क्षमता आहे.
- विडा व्ही १ प्रोला ८० किमी प्रति तासाच्या टॉप स्पीडसह १६५ किमीची रेंज सहज मिळेल आणि विडा व्ही१ प्लसला ८० किमीच्या टॉप स्पीडसह १४३ किमीची रेंज सहज मिळेल.
- हिरो विडामध्ये कंपनीने फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीलाही सपोर्ट केला आहे, ज्यामुळे ही इलेक्ट्रिक स्कूटर खूप वेगाने चार्ज करता येते.
हिरो विडा इलेक्ट्रिक स्कूटरच्या व्ही १ प्लस वेरिएंटची किंमत १.४५ लाख रुपये आणि व्ही १ प्रो व्हेरिएंटची किंमत १.५९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरची बुकिंग रक्कम २ हजार ४९९ रुपये निश्चित केली आहे. भारतात ही इलेक्ट्रिक स्कूटर ओला, अॅथर आणि ओकिनावाच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सला टक्कर देईल.