मुक्तपीठ टीम
काही दिवसांवरच दिवाळी सण येऊन ठेपला असून, एका शेतकऱ्याच्या चिमुरड्याने त्यात गोडधोड खायला मिळावे यासाठी एका शेतकऱ्याचा चिमुरड्या लेकराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र लिहिले आहे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील सहावीत शिकणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाने हे पत्र लिहिले आहे. हिंगोलीतील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान द्यावे, असे त्याने आपल्या पत्रात म्हटलं आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल सुद्धा होत आहे.
चिमुरड्याने पत्रात काय लिहिले?
- सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा प्रताप जगन कावरखे याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
- सणाला पोळ्या तर सोडा साधे गुपचूपसाठी पण पैसे सध्या नाहीत.
- जवळच्या जयपूर गावातील एका शेतकऱ्याच्या मुलाने पैसे मागितल्यामुळे फाशी घेतली.
- तेव्हा मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सुखी ठेवावे आणि अनुदान लवकर द्यावे,असेही पत्रात नमूद केले आहे.
- याच्या या पत्रामुळे सध्या यावर चर्चा सुद्धा त्याच प्रकारे रंगते आहे.
शेतकरी चिंतीत!!
- यावर्षी पावसाने सोयाबीन गेल्याने दसऱ्याला पुरणाच्या पोळ्या खायला मिळाल्या नाहीत,अशी खंत या चिमुरड्याने व्यक्त केली आहे.
- जुलै महिन्यात पावसाचा जोर कायम होता.
- ढगफुटी व सततच्या पावसामुळे सर्वत्र शेतजमिनी पाण्याखाली गेल्या.
- त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.
- बिकट परिस्थितीत शासनाच्या मदतीची अपेक्षा असताना सेनगाव तालुक्यातील चार मंडळे अतिवृष्टी अनुदानातून वगळल्याने शेतकरी चिंतीत झाला आहे.