Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जालना जिल्ह्यातील सोमठाना गडावर वृक्ष संवर्धनासाठी १० ते १२ लाख बियांची पेरणी! पर्यावरणासाठी झटणाऱ्या वृक्ष प्रेमीचे अथक प्रयत्न

October 10, 2022
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Tree Conservation

मुक्तपीठ टीम

पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे. तसेच हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. जालना जिल्‍हा हा भारतातील महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या मध्‍यभागी आहे. या जिल्ह्यात वृक्ष संवर्धनाविषयी जागृकता पाहायला मिळाली आहे. जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील श्री.रेणुका देवी संस्थान सोमठाणा हे प्रसिद्ध मंदिर आहे. सध्या सोमठाणा गडावरील श्री. रेणुका देवी व महादेव मंदिराच्या परिसरात भिक्कन सुखदेव पडूळ हे शासकीय सेवेतील अवलियाने विविध प्रजातीच्या वृक्षांची लागवड केली, विविध प्रकारच्या १० ते १२ लाख बियांची पेरणी केली.

 Tree Conservation

भिक्कन सुखदेव पडूळ हे राज्य उत्पादन शुल्क जालना कार्यालयातील दुय्यम निरीक्षक आहेत. त्यांना शेतीत काम करायला आवडते. यामुळेच त्यांनी पुढाकार घेत लोकांपर्यंत वृक्ष लागवडीविषयी जनजागृतीचे काम केले आहे. भिक्कन पडूळ यांचं दुधनवडी गाव इथून जवळच आहे. ते या गडावर गेले असताना तिथले उजाड माळरान पाहून इथे विविध प्रकारच्या झाडांची लागवड करता येईल हे त्यांच्या लक्षात आले.आपल्या मित्रमंडळींना त्यांनी हा विचार बोलून दाखवला आणि सुरू झाली रणनीती ती रेणुकामातेचा गड हिरवागार करण्याची.

Tree Conservation

वृक्ष लागवडीची जय्यत तयारी!

  • लिंबोळी,सागर गोटे,चिंच, वाल, बाभूळ, सीताफळ, जांभूळ, आंबे, आपटा, सेमल, हिरडा, बेहडा, रामकाट, करंज, आवळा, शिवन, बोर अशा आयुर्वेदिक औषधांच्या व फळ झाडाच्या जवळपास १० ते १२ लाख बिया जमावण्यात आल्या.
  • आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून सुट्टीच्या दिवशी जेसीबी मशीनच्या साह्याने आधी डोंगरावर चर खोदून घेण्यात आले.
  • पावसाचे पाणी अडवले जावे म्हणून व्यवस्थित नाली करून मग त्यामध्ये बीयाची लागवड करण्यात आली.
  • पावसाळ्यात ही झाडे जगतील पण पुढे काय, तर येत्या काही दिवसात स्वखर्चाने पाईप लाईन आणून ड्रिप बसवून पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे, असे सगळे नियोजन करूनच पावसाळ्याच्या तोंडावर रेणुका मातेच्या गडावर या बिया ११ जून आणि १४ जून या दोन दिवसांत पेरण्यात आल्या.
    . त्यानंतर तयार केलेल्या चरांमध्ये, पुन्हा माती पसरवण्यात आली.ठराविक अंतरावर फळ झाडांची रोपे लावून खड्डे भरून घेतली.

भिक्कन पडूळ यांनी रेणुका मातेचा गड हिरवाईने बहरण्याचं स्वप्न पाहिले ते सामाजिक जाणिवेतून.या निसर्गाचं आपणही काही देणं लागतो या भावनेतून १० ते १२ लाख झाडांच्या निर्मितीच हे कार्य नक्कीच इतरांसाठी आदर्श ठरावे असेच आहे. आपल्याला या भागात नंदनवन फुलवायच आहे,भविष्यात इथे दाट नंदनवन होईल, त्यामुळे निसर्गाचा समतोल होण्यात थोडीफार का होईना मदत होईल.परिसरात चांगला पाऊस पडेल आणि त्याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होईल अशी अपेक्षा भिक्कन पडूळ व्यक्त करतात.

Tree Conservation

सोमठाणा गडावरील रेणुकादेवी व महादेव मंदिर संस्थान आणि धार्मिक आणि पर्यटन विकास योजनेअंतर्गत गडावर अनेक विकास कामे झाली आहेत. सोमठाणा गडाच्या बाजूने समृद्धी महामार्ग झाला असून येथील तलावही प्रसिध्द आहे. पर्यटनासाठी जालनेकर तिथे हमखास जातात. नवरात्रात इथे रेणुका मातेची मोठी यात्रा ही भरते.

पाहा:


Tags: Bhikkan Sukhdev PadulEnvironmental Balancegood newsJalna DistrictmuktpeethSeed SowingSomthana FortTree Conservationघडलं-बिघडलंचांगली बातमीजालना जिल्हापर्यावरण संतुलनबी पेरणीभिक्कन सुखदेव पडूळमुक्तपीठवृक्ष संवर्धनसोमठाना गड
Previous Post

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा, ०९ ऑक्टोबर २०२२

Next Post

पुण्याच्या एआयसीटीएस संस्थेच्या तज्ज्ञांनी नवजात अर्भकावर केली पी डी ए स्टेन्टींग ही दुर्मिळ हायब्रीड शस्त्रक्रिया

Next Post
Army Institute of Cardio Thoracic Sciences

पुण्याच्या एआयसीटीएस संस्थेच्या तज्ज्ञांनी नवजात अर्भकावर केली पी डी ए स्टेन्टींग ही दुर्मिळ हायब्रीड शस्त्रक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!