मुक्तपीठ टीम
भारतात कार्बनशिवाय वीजनिर्मिती करण्यासाठी आधुनिक सामर्थ्यशाली तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, गुजरातमधील एनटीपीसीच्या कावस मिश्र चक्रीय वायू ऊर्जा संयंत्रामध्ये स्थापित जीईच्या 9ई गॅस टर्बाइनमध्ये नैसर्गिक वायूसह मिश्रित हायड्रोजन (H2) सह-ज्वलनाचे प्रदर्शन करण्याच्या व्यवहार्यतेच्या अनुषंगाने, देशातील सर्वात मोठी वीज निर्मिती कंपनी एनटीपीसी लिमिटेड आणि जीई गॅस पॉवर यांनी आज सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.या महत्त्वपूर्ण सहकार्या अंतर्गत, कावास वायू वीज निर्मिती संयंत्रामधून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी दोन्ही कंपन्या संयुक्तपणे मार्ग शोधतील आणि एनटीपीसीच्या भारतातील स्थापित युनिट्समध्ये याची मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी करतील.
एनटीपीसीचे कावस वायू वीज निर्मिती संयंत्र चार जीई ९ई गॅस टर्बाइनद्वारे समर्थित असून ते एकत्रित-चक्रीय पद्धतीत कार्यरत आहे आणि त्याची स्थापित क्षमता ६४५ मेगावॅट (एमडब्ल्यू ) आहे. नैसर्गिक वायू मिसळल्यावर, जीईचा अत्याधुनिक ई-क्लास गॅस टर्बाइन पोर्टफोलिओ सध्या हायड्रोजनच्या प्रमाणानुसार १००% पर्यंत ज्वलन करू शकतो. ही क्षमता वापरलेल्या ज्वलन प्रणालीच्या प्रकारानुसार बदलते, ज्वलन कक्षात खात्रीशीर इंधन वितरीत करण्यासाठी प्रमाणानुसार ५% पेक्षा जास्त हायड्रोजन असलेल्या इंधनांसाठी, गॅस टर्बाइन उपकरणांचे मूल्यांकन करणे आणि शक्यतो सुधारणे आवश्यक आहे.
भारतात एनटीपीसी अशा प्रकारच्या पहिल्या सामंजस्य करारानुसार ,जीई गॅस पॉवर नैसर्गिक वायूसह हायड्रोजन मिश्रण करण्यासाठी आवश्यक असलेल्या गॅस टर्बाइन युनिटमधील संभाव्य बदलांचे आणि सहाय्यक घटकांचे मूल्यांकन करेल.त्यानंतर, व्यवहार्यता अहवालाच्या आधारे सुरक्षित वातावरणात कावस वायू वीज निर्मिती संयंत्रामध्ये हायड्रोजनच्या ५% सह-ज्वलनासाठी पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाऊ शकते . एनटीपीसी या प्रकल्पासाठी आवश्यक हायड्रोजन उपलब्ध करेल.