मुक्तपीठ टीम
सध्या भारतात उत्सवांची जय्यत तययारी सुरू आहे. एका मागोमाग सण-समारंभ सुरूच आहेत. आता आतुरता आहे ती दिवाळीची. दिवाळी म्हटलं की, खरेदी तर, आलीच. मिळालेल्या माहितीनुसार, सणासुदीच्या या पहिल्या ७ दिवसात ४० हजार कोटी रुपयांची ऑनलाइन विक्री झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात २७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यादरम्यान ७.५ ते ८ कोटी ग्राहकांनी ऑनलाइन खरेदी केली. ऑनलाइन खरेदीमध्ये मोबाईलची विक्री ही सर्वाधिक झाली आहे.
ऑनलाइन खरेदीत इलेक्ट्रॉनिक उत्पादन आणि मोबाईलची सर्वाधिक विक्री!
- मोबाईल फोनची विक्री या वर्षात सात पटीने वाढली आहे.
- एकूण विक्रीत मोबाईल फोनचा वाटा ४१ टक्के आहे. तर कपड्यांची विक्री २० टक्के आहे.
- मागील वर्षीच्या तुलनेत यात ४८ टक्के वाढ झाली आहे. . . इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची विक्री पाच पटीने वाढली आहे.
- खरेदीदारांपैकी ६५ टक्के खरेदीदार लहान शहरांतील आहेत. अशा ग्राहकांच्या संख्येत दरवर्षी २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
१४ टक्के लोक ई-कॉमर्स साइटवरून खरेदी करणार!
- मिळालेल्या माहितीनुसार, १४ टक्के लोक ई-कॉमर्स वेबसाइटवरून खरेदी करतील.
- ७८ टक्के लोक त्यांच्या घराजवळील स्थानिक दुकानांतून खरेदी करतील.
- सर्वेक्षणानुसार, ऑक्टोबरमध्ये ५८ टक्के लोकांचा खर्च वाढला आहे.
- ४४ टक्के लोकांनी कपड्यांच्या खरेदीवर खर्च करणार असल्याचे सांगितले, तर ८ टक्के लोकांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल फोन खरेदी करण्याची योजना आखली.
भारतीय सेवा क्षेत्राने अलीकडच्या काही महिन्यांत अनेक अडथळ्यांवर मात केली आहे. किमतीचा दबाव, स्पर्धात्मक वातावरण आणि प्रतिकूल सार्वजनिक धोरणांमुळे वाढीवर तोल गेला आहे. रुपयाच्या तीव्र घसरणीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर अतिरिक्त आव्हाने निर्माण झाली आहेत. महागाईच्या दबावाखाली सप्टेंबरमध्ये देशातील सेवा क्षेत्रातील क्रियाकलाप सहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. याशिवाय, वाढलेल्या स्पर्धेमुळे नवीन व्यवसायाची वाढ मार्चपासून सर्वात मंदावली.