Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मल्लिकार्जून खरगेच काँग्रेसचे अध्यक्ष बनण्याची शक्यता! दलित चेहरा, गांधींसाठी सोयीचे, G23नाराजांचीही साथ आणि बरंच काही…

October 19, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Mallikarjun kharge

मुक्तपीठ टीम

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सुरु असलेल्या प्रदीर्घ गदारोळानंतर आता चित्र स्पष्ट झाले आहे. अध्यक्षपदासाठी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभा खासदार शशी थरूर यांच्यात लढत होणार आहे. मात्र खरगे विरुद्ध थरूर अशा सामन्यात खरगे यांचं पारडं जड असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. मल्लिकार्जुन खरगे हे पक्षाचे पुढील राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची शक्यता अधिक मानली जात आहे.

खरगे काँग्रेसचे पुढील अध्यक्ष होऊ शकतात…

  • खरगे यांनी ३० सप्टेंबर रोजी अर्ज दाखल केला, त्यानंतर आता १७ ऑक्टोबर रोजी अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार असून १९ ऑक्टोबरला निकाल लागणार आहे.
  • त्यांनी नामनिर्देशन केले तेव्हा त्यांच्यासोबत ३० प्रस्तावक उपस्थित होते.
  • ८० वर्षीय खरगे यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह उमेदवारी अर्जांचे १४ संच सादर केले.
  • त्यांच्या समर्थकांमध्ये अशोक गेहलोत, दिग्विजय सिंग, एके अँटनी, अंबिका सोनी, मुकुल वासनिक यांचा समावेश आहे.
  • याशिवाय, त्यांच्या समर्थकांमध्ये आनंद शर्मा, पृथ्वीराज चव्हाण, मनीष तिवारी आणि भूपेंद्र हुडा यांसारखे नेते आहेत, जे जी-२३ चा भाग आहेत, पक्षात बदल करण्याची मागणी करणाऱ्या नेत्यांचा गट.

खरगे यांच्या समर्थनार्थ G-23 चे अनेक नेते

  • शुक्रवारी एआयसीसी मुख्यालयात खरगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना पक्षाचे अनेक नेते त्यांच्यासोबत होते.
  • जी-२३ चे अनेक नेते त्यांना पाठिंबा देत आहेत.
  • खरगे यांच्या कागदपत्रांवर अनेक खासदारांनी सह्याही केल्या आहेत.
  • जर खरगे यांनी निवडणूक जिंकली तर ते एस निजलिंगप्पा यांच्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) अध्यक्ष बनणारे कर्नाटकातील दुसरे नेते असतील.
  • विजयी झाल्यास जगजीवन राम यांच्यानंतर हे पद भूषवणारे ते दुसरे दलित नेते असतील.

थरूर यांनी उमेदवारी अर्जाचे केवळ ५ संच भरले

  • शशी थरूर हे स्वतः जी-२३ चे सदस्य राहिले आहेत.
  • त्यांनी उमेदवारी अर्जाचे ५ संच दाखल केले.
  • थरूर यांच्या काही समर्थकांमध्ये चिदंबरम, मोहम्मद जावेद आणि प्रद्युत बोरदोलोई यांचा समावेश होता.
  • ६६ वर्षीय थरूर यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी खरगे यांना पक्षाचे ‘भीष्म पितामह’ असे संबोधले.

खरगे नेहमीच नेहरू-गांधी घराण्याशी एकनिष्ठ

  • ५० वर्षांहून अधिक काळ खरगे राजकारणात सक्रिय आहेत.
  • खरगे हे नेहरू-गांधी घराण्याशी नेहमीच प्रामाणिक मानले गेले आहेत.
  • काँग्रेसने आयोजित केलेल्या निदर्शनांमध्ये त्यांनी नेहमीच सक्रिय भूमिका बजावली आहे.
  • अलीकडच्या काळात, जेव्हा राहुल आणि सोनिया गांधी यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले होते तेव्हाही ते पुढे आले होते.
  • रस्त्यावर निदर्शने करताना ते उपस्थित होते.

Tags: CongressCongress leader Mallikarjun KhargeG-23Shashi Tharoorकाँग्रेसजी-२३मल्लिकार्जुन खरगेशशी थरूर
Previous Post

देशातील वैविध्यपूर्ण संस्कृती विदेशी पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू- केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक

Next Post

एक 5G नेटवर्क, १० मोठे फायदे! समजून घ्या…

Next Post
5g

एक 5G नेटवर्क, १० मोठे फायदे! समजून घ्या...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!