मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेत उभी फुट पडली. शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील मूळ शिवसेना कोणाची हा वाद न्यायप्रविष्ठ असतानाच दसरा मेळावा जवळ आला आहे. शिवाजी पार्क आणि बीकेसी मैदानावर एकाच दिवशी आणि एकाच वेळी मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याने दोन्ही गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शनासाठी तयारी सुरु आहे. या दसऱ्या मेळाव्यात दोन्ही गटाकडून विक्रमी गर्दी होईल असा दावा करण्यात येत असल्याने पोलिसांसमोर दुहेरी आव्हान उभं राहिलं आहे. यादिवशी कायदा आणि सुरक्षा तसेच वाहतूककोंडी ही दोन मोठी आव्हाने पोलिसांपुढे आहेत.
दसऱ्याच्या दिवशी मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी!!
- यंदा शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून दसरा मेळाव्यात शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. आपणच मूळ शिवसेना असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न होणार आहे.
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने तीन हजार, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने १,४०० खासगी बस आरक्षित केल्या आहेत.
- राज्यातील खासगी बस चालक-मालकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगर प्रदेशासह पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भ, खान्देश येथून मुंबईत येण्यासाठी खासगी बसगाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे.
- मुंबईत दसऱ्याच्या दिवशी, बुधवारी दुपारपर्यंत या गाड्या पोहोचतील, असे नियोजन आहे.
- शहरात पार्किंगची मोठी समस्या आहे.
- त्यातच एकाच दिवशी हजारो बस मुंबईत दाखल होणार असल्याने दसऱ्याला प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची भीती आहे.
पोलिसांसमोर दुहेर आव्हान!!
- एकाच दिवशी आणि एकाच वेळी दोन्ही मेळावे आयोजित करण्यात आल्यामुळे पोलिसांना दोन्ही ठिकाणी बंदोबस्त ठेवावा लागणार आहे.
- या दिवशी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिसांनी चाचपणी सुरू केली आहे.
- बीकेसी येथे होणाऱ्या मेळाव्याला मुख्यमंत्री तसेच इतर मंत्री उपस्थित राहणार असल्याने नियमावलीप्रमाणे त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे लागणार आहे.
- तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि त्यांचे शिवसैनिकही मेळाव्यासाठी एकत्र येणार असल्याने या ठिकाणीही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे.
- स्थानिक पोलिस, सशस्त्र दलाचे पोलिस, एसआरपीएफ यांची आवश्यकतेनुसार मदत घेण्यात येणार आहे.
- मुंबई तसेच बाहेरून मेळाव्यासाठी येणारे कार्यकर्ते आणि त्यांची वाहने यामुळे कोंडी होऊ नये यासाठी दोन्ही ठिकाणच्या आयोजकांना सूचना देण्यात आल्या आहे.
- मेळाव्याच्या ठिकाणी येताना दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने येऊ नयेत, याचीही खबरदारी पोलिसांकडून घेण्यात येणार आहे.
- यासाठी वेगवेगळ्या मार्गावर पोलिस तैनात ठेवण्यात येत