मुक्तपीठ टीम
गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेली टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार अखेर लाँच झाली आहे. टाटाने भारतात आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार टिआगो ईव्ही लॉंच केली आहे. ही कार अनेक नवीन फिचर्ससह ऑफर केली जाईल. टाटा टिआगो आगामी कार २६ किलो वॅट बॅटरी आणि एका चार्जवर ३०० किमी पर्यंतची रेंज देखील देऊ शकते. सुरक्षिततेच्या दृष्टीने ही एक पॉवरफुल कार असेल आणि ही कार देखील ग्लोबल एनसीएपी टेस्टिंगमध्ये ४ किंवा ५ स्टार मिळवेल अशी अपेक्षा आहे.
टाटा टिआगो ईव्ही कार फिचर्स
- ही कार तिच्या पेट्रोल व्हर्जनसारखीच दिसेल.
- पण, आता कंपनीने या कारमध्ये नवा निळा रंग आणला आहे. टाटा टिगोर आणि टाटा नेक्सॉनच्या ईव्ही मॉडेल्सवर हा रंग आधीच देण्यात आला आहे.
- कंपनीने कारच्या फ्रंट ग्रिल आणि इंटीरियरवर हा निळा रंग वापरला आहे.
- उर्वरित कारमध्ये कोणतेही बदल केले गेले नाहीत आणि त्याची रचना पूर्वीसारखीच आहे.
- टाटा टिआगोमध्ये २६ किलोवॅट बॅटरी वापरली आहे. या बॅटरीमध्ये एका चार्जमध्ये ३०० किमीची रेंज देण्याची क्षमता आहे.
- या कारची बॅटरी एका इंजिनसह जोडलेली आहे जी ७४.७ पीएस पॉवर आणि १७०एनएम पीक टॉर्क जनरेट करते.
- ही ड्रॉन्ट व्हील ड्राइव्ह कार असेल. या इलेक्ट्रिक कारची बॅटरी अवघ्या ६५ मिनिटांत ८० टक्के चार्ज होऊ शकते.
- कंपनी XPres-T व्हेरिएंटमध्ये ही कार लॉंच करेल अशी अपेक्षा आहे. XPres-T व्हेरिएंट कमी शक्तिशाली इंजिनसह येईल आणि एका चार्जवर २०० किमीची रेंज देईल.
टाटा टिआगो ईव्हीची किंमत किती असणार?
- ही कार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असेल. कंपनीने या कारची किंमत १० लाख रुपयांपेक्षा कमी ठेवावी अशी अपेक्षा आहे.
- जर या इलेक्ट्रिक कारची किंमत १० लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर ही कार भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार होईल.
टाटा टियागो या कारमध्ये पेट्रोल वेरिएंटपेक्षा काही अधिक फीचर्स मिळू शकतात. या नवीन कारमध्ये क्रूझ कंट्रोल आणि मल्टिपल री-जेन मोड दिले जातील. या इलेक्ट्रिक कारमध्ये राइडिंग मोड देखील दिले जाऊ शकतात. या रायडिंग मोड्सच्या मदतीने चांगली रेंज मिळेल.