Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नवरात्रीत ‘पीएफआय’सह नऊ राक्षसांना संपवले; आता ‘एस्.डी.पी.आय’वर बंदी घालून ‘दसरा’ साजरा करावा!

हिंदु जनजागृती समितीची केंद्र सरकारकडे मागणी

September 28, 2022
in घडलं-बिघडलं
0
Hindu Janajagruti Samiti

मुक्तपीठ टीम

केंद्र सरकारने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ अर्थात् ‘पी.एफ.आय.’वर बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याद्वारे (UAPA) बंदी घातली, या निर्णयाचे हिंदु जनजागृती समिती स्वागत करते. ‘पी.एफ्.आय.’चा अनेक राष्ट्रविरोधी आणि आतंकवादी कारवायांमध्ये, तसेच हिंदु नेत्यांच्या हत्यांमध्ये सहभाग आढळून आला आहे. हिंदु जनजागृती समितीने गेली काही वर्षे आंदोलने, निवेदने, सोशल मिडीया कॅम्पेन आदींच्या माध्यमांतून ‘पी.एफ्.आय.’वर बंदी घालण्याची मागणी लावून धरली होती. देशात नवरात्री चालू आहे आणि त्यातच ‘पी.एफ्.आय.’सह नऊ राक्षसी जिहादी संघटनांना संपवण्यात आले आहे. आता ‘पी.एफ्.आय.’ची राजकीय संघटना असलेल्या ‘एस्.डी.पी.आय.’वर बंदी आणून ‘दसरा’ साजरा करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.

काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने डॉ. झाकीर नाईक याच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’वर बंदी घालत त्याला फरार आतंकवादी घोषित केले होते; मात्र याच आतंकवाद्याची ट्वीटर आणि फेसबुक या सामाजिक माध्यमांवर ५० हून अधिक खाती चालूच आहेत. याचप्रकारे आता ‘पी.एफ्.आय.’ आणि संलग्न संस्था यांवर जरी बंदी आणली असली, तरी त्यांचीही ट्वीटर आणि फेसबुक खाती अजूनही चालू आहेत. या बंदीमुळे आतंकवादी कारवाया नक्कीच थांबतील; मात्र आतंकवादी विचारसरणी पसरवण्याचे कार्य चालूच राहिल. जर यांचा सोशल मिडीयावर दहशतवादाचा प्रसार चालू राहिला, तर देशात अराजक माजवण्यासाठी त्याचा वापर होईल आणि प्रत्यक्ष घातलेल्या या बंदीला काही अर्थ रहाणार नाही. त्यामुळे ‘पी.एफ्.आय.’ आणि तिच्याशी संलग्न सर्व संघटनांची ट्वीटर आणि फेसबुक, तसेच अन्य सोशल मिडीया अकाऊंटही तत्काळ बंद केली पाहिजेत, अशी आमची आग्रही मागणी आहे.

पुण्यात नुकतेच ‘पी.एफ्.आय.’च्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले, त्यामध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या. असे प्रकारही आता मोठ्या प्रमाणात होतील. तरी अशा घोषणा देणार्‍यांवरही देशद्रोहाचे खटले दाखल करावेत, अशीही समितीने मागणी केली आहे.


Tags: central GovernmentHindu Janajagruti SamitimuktpeethPFIPopular front of indiaकेंद्र सरकारघडलं-बिघडलंपी.एफ.आयपॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियामुक्तपीठहिंदु जनजागृती समिती
Previous Post

अशोक पवार यांच्या एककल्ली कारभारामुळे ‘घोडगंगा’ अडचणीत

Next Post

मराठा जागर परिषदेचे अध्यक्ष प्रा. संभाजी पाटील यांचा सहकाऱ्यांसह भाजपामध्ये प्रवेश

Next Post
Bharatiya Janata Party

मराठा जागर परिषदेचे अध्यक्ष प्रा. संभाजी पाटील यांचा सहकाऱ्यांसह भाजपामध्ये प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!