Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एम्सची कामगिरी : मोफत करणार फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया!

September 27, 2022
in featured, आरोग्य, चांगल्या बातम्या
0
AIIMS

मुक्तपीठ टीम

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान आता रुग्णांसाठी एक आशेचं किरण ठरत आहे. एम्स प्रशासनाने मोफत फुफ्फुस प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्यारोपणाचा संपूर्ण खर्च एम्स प्रशासन उचलणार आहे.

औषधासह इतर सर्व खर्चही रुग्णाला करावा लागणार नाही. त्याचा थेट फायदा अशा रुग्णांना होणार आहे जे आर्थिक परिस्थितीमुळे प्रत्यारोपण करणं टाळतात. याचे कारण म्हणजे त्याची किंमत किमान ५० लाख रुपये आहे. एम्स प्रशासनाने आतापर्यंत पाच रुग्णांची यादी तयार करून ती नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनला पाठवली आहे. येथून फुफ्फुस मिळाल्यानंतर एम्स प्रत्यारोपणाची प्रक्रिया सुरू करेल.

एम्सचे १५ प्रत्यारोपण मोफत करण्याचे उद्दिष्ट!

  • एम्स प्रशासनाने १५ रुग्णांना मोफत फुफ्फुस प्रत्यारोपणाचे लक्ष्य ठेवले आहे.
  • मे महिन्यात एका रुग्णावर यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले आहे.
  • एम्समधील फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी तयार करण्यात आलेल्या टीमचे सदस्य आणि कार्डिओलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. संदीप सेठ यांनी सांगितले की, त्याची प्रक्रिया सुरू आहे.
  • आता १५ रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहेत. एम्स प्रत्यारोपणाच्या खर्चासाठी आपल्या स्तरावर आणि इतर स्रोतांमधून निधी उभारण्याचा प्रयत्न करत आहे.
  • लक्ष्य गाठल्यानंतर पुढील कृती आराखडा तयार केला जाईल.
  • सरकारी रुग्णालयात ५० लाख आणि खासगी रुग्णालयांमध्ये १.५० कोटींपर्यंत तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सामान्यतः सरकारी रुग्णालयांमध्ये फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी ५० लाख रुपये खर्च येतो, तर खासगी रुग्णालयांमध्ये ७० लाख ते १.५० कोटी रुपये खर्च येतो.

डब्ल्यूएचओशी जोडलेला जीओडीटी डेटा दर्शवितो की, २०२१ मध्ये भारतात १३३ फुफ्फुस प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. २०२० मध्ये ६७ आणि २०१९ मध्ये ११४ प्रत्यारोपण झाले. यापैकी बहुतेक प्रत्यारोपण दक्षिण भारतातील रुग्णालयांमध्ये झाले आहेत.

६ मे रोजी पहिले फुफ्फुस प्रत्यारोपण करण्यात आले

  • ६ मे रोजी एम्समध्ये पहिले फुफ्फुस प्रत्यारोपण करण्यात आले.
  • ३६ वर्षीय सपना, जी ५ वर्षांपासून न्यूमोनियाने ग्रस्त होती, तिच्या फुफ्फुसांनी काम करणे बंद केले.
  • नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून निरोगी फुफ्फुसे सापडल्यानंतर ६ मे रोजी प्रत्यारोपण करण्यात आले.
  • तीन दिवसांनंतर तिला शुद्ध आली आणि २० जुलै रोजी डिस्चार्ज देण्यात आला.

पाहा:


Tags: aiimsAll India Institute of Medical Sciencesgood newshealthLung Transplant Surgerymuktpeethअखिल भारतीय आयुर्विज्ञानआरोग्यएम्सचांगली बातमीफुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रियामुक्तपीठ
Previous Post

महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावरील कळसूबाई नवरात्रौत्सवाला वारली चित्रकलेचा साज

Next Post

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते ‘बीवायपी, व्हीआयपी आणि मी’ पुस्तकाचे दिमाखदार सोहळ्यात प्रकाशन!

Next Post
Veteran actor Dilip Prabhavalkar

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते 'बीवायपी, व्हीआयपी आणि मी' पुस्तकाचे दिमाखदार सोहळ्यात प्रकाशन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!