मुक्तपीठ टीम
आधार कार्ड हे सरकारने भारतीय नागरिकांना जारी केलेले ओळखपत्र नसेल, असे आता कमीच असतील. त्यावर १२ अंकी क्रमांक असतो जो भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच एएआयद्वारे जारी केला जातो. हा क्रमांक भारतात कोठेही व्यक्तीच्या ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा असेल. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यूआयडीएआय आधारमध्ये महत्त्वपूर्ण बदल करणार आहे. या अंतर्गत लोकांना १० वर्षात आधार अपडेट करावा लागेल.
यूआयडीएआयने दिलेल्या माहितीनुसार, लोकांना त्यांचे बायोमेट्रिक्स, डेमोग्राफिक्स इत्यादी दर १० वर्षांतून एकदा अपडेट करण्यासाठी प्रोत्साहित करेल. जर एखाद्या व्यक्तीचे वय ७० वर्षांपेक्षा जास्त असेल तर त्याची गरज भासणार नाही. मेघालय, नागालँड आणि लडाख येथील काही टक्के लोक वगळता देशातील जवळजवळ सर्व प्रौढांसाठी आधार गरजेचे आहेत. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स मुद्द्यामुळे नागालँडमध्ये नावनोंदणी उशीरा सुरू झाली, तर नागालँड आणि लडाखमधील काही दुर्गम भागांचा समावेश करणे बाकी आहे.
पोस्टमन नावनोंदणी केंद्रांशी जोडले जाणार…
- यूआयडीएआयकडे ५० हजारांपेक्षा जास्त नावनोंदणी केंद्रे आहेत.
- लवकरच दीड लाख पोस्टमनही याअंतर्गत जोडले जाण्याच्या तयारीत आहेत.
- सुरुवातीला हे पोस्टमन आधार कार्डधारकांचे मोबाईल क्रमांक आणि पत्ते अपडेट करतील. यामुळे लोकांना घरबसल्या आधार नोंदणीसारख्या सुविधा मिळू शकणार आहेत.
यूआयडीएआय राज्यांच्या कल्याणकारी योजनांशी जोडण्याची तयारी करत आहे. यामुळे फसवणूक रोखण्यास मदत होईल. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची डिजीयात्रा योजनाही प्रवाशांच्या पडताळणीसाठी आधारशी जोडली जाईल.