मुक्तपीठ टीम
जलद धावपटू हिमा दास आसाम पोलीस दलात उपअधीक्षक पदावर रुजू झाली आहे. मैदान गाजवणारी हिमा आता पोलिसांच्या पेशाखात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिमाला उपअधीक्षक पदावर रुजू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सर्वानंद सोनोवाल हे स्वत: केंद्रात क्रीडामंत्री राहिले आहेत. त्यांनीच स्वत: हिमाला नियुक्ती पत्र दिले.
— Hima (mon jai) (@HimaDas8) February 26, 2021
यावेळी हिमा दासने सांगितले की, “लहानपणापासूनच पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न होते. मी पोलीस दलात रुजू व्हावी अशी माझ्या आईचीही इच्छा होती. ते स्वप्न आज पूर्ण झाले आहे”. हिमाची उपअधीक्षक पदावर नियुक्ती झाल्यानंतर केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनीही हिमाचे अभिनंदन केले आणि मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाबद्दल त्यांचे आभार मानले.
हिमाने आयएएएफच्या वर्ल्ड अंडर २०च्या चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय धावपटू आहे. हिमाच्या नावावर ४०० मीटर स्पर्धेचा राष्ट्रीय विक्रमही आहे. त्यामुळे पोलीस दलात दाखल झाली असली तरी हिमा धावपटू म्हणून करिअर सुरूच ठेवणार आहे.