Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘वेगन’ वनस्पतीजन्य मांस उत्पादनांची प्रथमच भारतातून अमेरिकेला निर्यात

September 23, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Export of 'vegan' plant-based meat products from India to US

मुक्तपीठ टीम

वैशिष्ट्यपूर्ण प्रकारच्या कृषी प्रक्रियायुक्त अन्न उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, केंद्र केंद्र सरकारने निर्यात प्रोत्साहन क्षेत्रातील शिखर संस्था असलेल्या अपेडा अर्थात कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्न उत्पादने निर्यात प्राधिकरणाच्या माध्यमातून गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील नडियाद येथून अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये निर्यात करण्यासाठी ‘वेगन’ -म्हणजेच कुठलाही प्राणीजन्य घटक नसलेल्या खाद्यान्न श्रेणीतील वनस्पतीजन्य मांस उत्पादनांची पहिली खेप रवाना केली आहे.

विकसित देशांमध्ये वेगन प्रकारच्या अन्नपदार्थांची वाढती लोकप्रियता बघता, वेगन अन्न उत्पादनांमध्ये उच्च पोषण-मूल्ये आल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये वनस्पतीजन्य अन्न उत्पादनांच्या निर्यातीला प्रचंड वाव आहे. या प्रकारच्या उत्पादनांमध्ये तंतुमय घटकांची विपुलता आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण तुलनेने कमी असल्यामुळे, वेगन श्रेणीतील पदार्थ  जगभरात प्रचलित अन्न पदार्थांना उत्तम पर्याय म्हणून लोकप्रिय होत आहेत.

नडियाद येथून अमेरिकेला निर्यात करण्यात आलेल्या पहिल्या खेपेत, मोमोज, छोटे समोसे, पॅटीस,नगेट्स, स्प्रिंग रोल्स, बर्गर, इत्यादी पदार्थांचा समावेश आहे. या मालाच्या वाहतुकीसाठी खेडा जिल्हा प्रशासनाकडून वाहतूकविषयक पाठबळ पुरविण्यात आले.

या पदार्थांच्या परदेशी निर्यातीसाठी नवनव्या ठिकाणांचा शोध घेण्याच्या गरजेवर भर देत अपेडाचे अध्यक्ष डॉ.एम.अंगमुथु म्हणाले की, पारंपरिक वनस्पतीजन्य मांसाच्या निर्यात बाजाराला धक्का न लावता वनस्पतीजन्य मांसयुक्त अन्न पदार्थांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अपेडा विविध प्रकारे प्रयत्न करत आहे.

येत्या काही महिन्यांमध्ये, पॅनकेक, स्नॅक्स, चीझ इत्यादी पदार्थांसह इतर विविध वेगन अन्न उत्पादनांच्या ऑस्ट्रेलिया, इस्रायल,न्यूझीलंड आणि इतर अनेक देशांमधील निर्यातील प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने अपेडा नियोजन करीत आहे.

अपेडाने आभासी मेळावे, शेतकरी संपर्क पोर्टल, ई-ऑफिस, हॉर्टीनेट, शोध यंत्रणा, खरेदीदार-विक्रेते मेळावे, रिव्हर्स खरेदीदार-विक्रेते मेळावे, उत्पादन-विशिष्ट जाहिरात मोहिमा इत्यादींचे आयोजन करण्यासाठी आभासी पोर्टलच्या विकासातून अनेक निर्यात प्रोत्साहन विषयक मोहिमा आणि उपक्रम हाती घेतले आहेत. राज्यांमध्ये निर्यातविषयक पायाभूत सुविधा निर्मिती तसेच निर्यातीसाठी स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी अपेडा राज्य सरकारांसोबत सखोल समन्वय साधून काम करीत आहे.

पाहा:


Tags: Good news MorningGujaratIndiaUSVegan FoodVegan plant-based meatsगुजरातगुड न्यूज मॉर्निंगवेगन वनस्पतीजन्य मांस
Previous Post

कौशल्य विकासासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सोबत सामंजस्य करार

Next Post

कोल इंडियात मेडिकल क्षेत्रात १०८ जागांवर करिअर संधी

Next Post
Coal India Limited

कोल इंडियात मेडिकल क्षेत्रात १०८ जागांवर करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!