Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

माथाडी कामगारांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन प्रयत्नशील – कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे

September 22, 2022
in सरकारी बातम्या
0
Min Suresh Khade Meeting 1

मुक्तपीठ टीम

माथाडी कामगारांना सहकार्य करण्याची शासनाची भूमिका असून त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी आणि त्यांच्या पाल्यांसाठी शासन योग्य ती पाऊले उचलत असल्याची ग्वाही कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी कामगार संघटनाच्या प्रतिनिधींना दिली.            

माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नासंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस विधानपरिषद सदस्य शशिकांत शिंदे, माजी आमदार नरेंद्र पाटील, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल, कामगार आयुक्त सुरेश जाधव, उपसचिव दादासाहेब खताळ,  माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते .            

मंत्री डॉ. खाडे म्हणाले, विविध माथाडी मंडळातील कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच ही नियुक्ती कायमस्वरुपी करावयाची असल्यास बिंदू नामावली, आकृतीबंध तपासून ती करण्यात येईल. मालिका, नाटक, चित्रपट कामगारांकरिता स्थापन झालेल्या माथाडी बोर्डाच्या धर्तीवरच रंगकर्मी बोर्डाची स्थापना करण्यासाठी तसेच या कामगारांना संरक्षण देण्यासाठी हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल, असेही ते म्हणाले.            

कामगारांच्या फायद्यासाठी शासनाची यंत्रणा कार्यरत आहे. कामगार कायद्यानुसार प्रत्येक कामगारांना त्यांच्या न्याय हक्काप्रमाणे अनुदान, संरक्षण मिळाले पाहिजे. कामगार जगला पाहिजे तसेच कंपनीही चालली पाहिजे. माथाडी कामगार कायद्याच्या परिणामकारक अंमलबजावणीकरिता लवकरच कायद्यात बदल करण्यात येतील. कामगारांच्या प्रत्येक समस्या निवारणासाठी आम्ही सुरूवात केली असून त्यांच्याकरिता कार्यपद्धतीही (SOP) लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही मंत्री डॉ. खाडे यांनी यावेळी सांगितले.            

माथाडी कामगारांच्या हजेरीसंदर्भात पारदर्शकता आणण्यासाठी कंपनीने कार्यस्थळी सीसीटीव्ही लावावेत. त्याचप्रमाणे प्रत्येक नोंदणीकृत कामगारांना बायोमेट्रिक उपस्थितीची व्यवस्था करावी, जेणेकरून कामगारांना पगार देणे सोईस्कर होईल. माथाडी कामगारांचे नियम राज्यातील सर्व कंपन्यांना लागू असून प्रत्येकांनी पाळावेत. कंपन्यानी माथाडी कामगारांची मागणी करावी. आवश्यकतेनुसार सर्व कंपन्याना माथाडी कामगार पुरविले जातील, असेही मंत्री डॉ.खाडे यांनी सांगितले.


Tags: Labor Minister Dr. Suresh KhadeMathadi Workersकामगार मंत्री डॉ.सुरेश खाडेमाथाडी कामगार
Previous Post

नवीन स्टार्टअप्सना पीक विमा क्षेत्रात योगदान देण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

Next Post

माझे कुटुंब माझी जबाबदारी, उद्धव ठाकरेंना परिवाराशिवाय कोणीच दिसत नाही

Next Post
Bawankule And uddhav thackeray

माझे कुटुंब माझी जबाबदारी, उद्धव ठाकरेंना परिवाराशिवाय कोणीच दिसत नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!