मुक्तपीठ टीम
बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची आज निवडणूक आयोगाने घोषणा केली. या राज्यांमधील विधानसभेची मुदत मे आणि जूनमध्ये संपुष्टात येत आहे. २७ मार्च ते २९ एप्रिलपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये या राज्यांमध्ये मतदान होणार आहे. आसाम, पुद्दुचेरी आणि तामिळनाडूत एकाच दिवशी मतदान होईल. तर बंगालमध्ये आठ आणि केरळात तीन टप्प्यामध्ये मतदान असेल. मतमोजणी २ मे रोजी होऊन सर्वांचं भवितव्य जाहीर होईल.
कधी आणि किती टप्प्यांमध्ये होणार मतदान?
१.
पश्चिम बंगाल
सध्या सत्ता – तृणमूल काँग्रेस
विधानसभा एकूण जागा – २९४
टप्पे – ८
मतदान – २७ मार्च, १ एप्रिल, ६ एप्रिल, १० एप्रिल, १७ एप्रिल, २२ एप्रिल, २६ एप्रिल, २९ एप्रिल
२
आसाम
सध्या सत्ता – भाजपा
विधानसभा एकूण जागा – १२६
टप्पे – ३
मतदान – २७ मार्च, १ एप्रिल, ६ एप्रिल
३
तामिळनाडू
सध्या सत्ता – अण्णा द्रमुक
विधानसभा एकूण जागा – २३४
टप्पा – १
मतदान – ६ एप्रिल
४
केरळ
सध्या सत्ता – डावी आघाडी
विधानसभा एकूण जागा – १४०
टप्पे – १
मतदान –६ एप्रिल
५
पुद्दुचेरी
सध्या सत्ता – काँग्रेसची होती, फुटल्याने गेली
विधानसभा एकूण जागा – ३०
टप्पा – १
मतदान – ६ एप्रिल
मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ही माझी शेवटची पत्रकार परिषद असेल. ३० एप्रिल रोजी मी निवृत्त होत आहे : सुनील अरोडा, मुख्य निवडणूक आयुक्त