मुक्तपीठ टीम
इंडिगो एअरलाईनच्या आपत्कालीन एक्झिट रांगेत बसलेल्या एका तेलगू महिलेला इंग्रजी आणि हिंदी बोलता येत नसल्यामुळे तिची सीट बदलण्यास भाग पाडण्यात आले. दोन दिवसांपूर्वी विजयवाडा-हैदराबाद मार्गावरील (6E7297 फ्लाइट) फ्लाईटमध्ये ही घटना घडली. या प्रकरणानंतर तेलंगणाचे मंत्री केटी रामाराव यांनी विमान कंपनीला स्थानिक भाषांचा आदर करण्याची विनंती केली आहे. या निमित्तानं तेलंगणाच्या तेलुगू मंत्र्यांनी दाखवलेला बाणा आणि महाराष्ट्रातील अनेक राजकारण्यांच्या मुळुमुळू वागण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.
केटी रामाराव यांनी ट्वीट करत म्हणाले की, “प्रिय @IndiGo6E व्यवस्थापन, मी तुम्हाला स्थानिक भाषा आणि प्रवाशांचा आदर करण्याची विनंती करतो. ज्यांना इंग्रजी किंवा हिंदी भाषेचे चांगले ज्ञान नाही, त्यांचाही आदर करा,
प्रादेशिक फ्लाईटसाठी अधिक कर्मचारी नियुक्त करा जे तेलुगु, तामिळ, कन्नड इत्यादी स्थानिक भाषा बोलू शकतात. हा एक परिपूर्ण उपाय असेल’. इंडिगोने अद्याप मंत्री किंवा त्यांच्यावरील आरोपांना उत्तर दिलेले नाही.
संबंधित घटना कशी उघडकीस आली?
- आयआयएम अहमदाबाद येथील सहाय्यक प्राध्यापिका देवस्मिता चक्रवर्ती यांनी ही घटना उघडकीस आणली.
- त्यांनी सांगितले की, फ्लाईट अटेंडन्टने इंग्रजी आणि हिंदी समजत नसलेल्या महिलेला सुरक्षेच्या कारणावरून जागा बदलण्यास भाग पाडलं.
- देवस्मिता चक्रवर्ती यांनी एक फोटो पोस्ट करत म्हटले आहे की, ”हिरव्या रंगाची साडी परिधान केलेली महिला 2A (XL सीट, एक्झिट रो) मध्ये बसलेली होती.
- मात्र तिला 3C सीटवर बसण्यास भाग पाडले गेले, कारण तिला इंग्रजी/हिंदी नव्हे तर फक्त तेलुगू समजते.
- हा सुरक्षेचा प्रश्न असल्याचे फ्लाईट अटेंडन्टने म्हटले.
- मात्र केवळ भाषा येत नाही, हा कसकाय सुरक्षेचा मुद्दा होऊ शकतो? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
Indigo 6E 7297. Vijayawada (AP) to Hyderabad (Telangana), Sept 16-2022. The woman in green originally sitting in 2A (XL seat, exit row) was forced to seat 3C because she understood only Telugu, not English/Hindi. The attendant said it’s a security issue. #discrimination @IndiGo6E pic.twitter.com/bHa8hQj5vz
— Devasmita Chakraverty, PhD, MPH (@DevasmitaTweets) September 17, 2022