मुक्तपीठ टीम
देशात आफ्रिकन चित्त्याचं आगमन झालं आहे. वेगळ्या खंडातील या चित्त्यांना मध्यप्रदेशातील श्योपूर कुनो-पालपूर नॅशनल पार्कमध्ये १७ सप्टेंबर रोजी म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी सोडण्यात आलं. नामिबियातून आलेल्या या चित्त्यांना भारतीय जंगलातील वातावरणात मिसळण्यासाठी काही काळ लोकांपासून दूर ठेवण्यात येणार आहे. हे दुर्मीळ प्राणी असल्यानं वाघांप्रमाणेच त्यांनाही सॅटेलाइट कॉलर आयडी लावण्यात आले आहेत. यानिमित्तानं सॅटेलाइट कॉलर आयडी नेमके कशासाठी आणि ते कसे काम करतात हे जाणून घेणं महत्वाचं आहे.
आठ चित्ते आणण्यात आले. दक्षिण आफ्रिकाही चित्ता पाठवण्याच्या तयारीत आहे. यासाठी नुकतेच तेथील पथकाने उद्यान पाहिल्यानंतर समाधान व्यक्त केले होते. सध्या कुनो अभयारण्यात नामिबियातून आलेल्या या चित्त्यांसाठी पाच चौरस किलोमीटरचा खास परिसर बांधण्यात आला आहे. ७० वर्षांनंतर हा प्राणी भारतात परतला. जगात चित्त्यांच्या घटत्या संख्येमुळे त्याचा समावेश संकटात सापडलेल्या प्राण्यांच्या यादीत झाला आहे. या चित्तांवर लक्ष ठेवण्यासाठी सॅटेलाइट कॉलर आयडीची मदत घेतली जाणार आहे.
कुनो प्रशासन, वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया डेहराडूनचे तज्ज्ञ चित्ता त्यांच्या वास्तव्यादरम्यान काय करतात यावर लक्ष ठेवतीलच, पण ८ हजार किमी दूर असलेल्या दक्षिण आफ्रिकेचे सरकार आणि वन्यजीव तज्ज्ञही त्यावर लक्ष ठेवतील. यासाठी प्रत्येक चित्त्याच्या गळ्यात सॅटेलाइट कॉलर आयडी असेल. गळ्यातील सॅटेलाइट कॉलर आयडीमुळे त्यांची हालचाल आणि आरोग्य रेकॉर्ड करणे सोपे आहे.
सॅटेलाइट कॉलर आयडी कसे कार्य करते?
- अॅनिमल मायग्रेशन ट्रॅकिंग असही या तंत्रज्ञानाला म्हटले जाते.
- चित्यांनी परिधान केलेल्या सॅटेलाइट कॉलर आयडीमध्ये स्मार्टफोन किंवा इतर मोबाइल उपकरणांसारखीच जीपीएस चिप असते.
- या चिपच्या मदतीने उपग्रह प्राण्यांच्या स्थितीत आणि स्थानातील बदल शोधू शकतात आणि डेटा तज्ज्ञांना पाठवू शकतात.
- कॉलर आयडी अशा प्रकारे तयार केला आहे की त्याला प्राण्यांच्या हालचालींमुळे कोणत्याही प्रकारे इजा होणार नाही.
सॅटेलाइट कॉलर आयडीचा उपयोग काय?
- काय करतो, किती सक्रिय असतो, कोणत्या वेळी अधिक सक्रिय असतो आणि त्याची सद्यस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी केला जातो.
- अशाप्रकारे प्राण्याच्या दिनचर्येवर किंवा त्याच्या सभोवतालच्या वातावरणावरही परिणाम होत नाही आणि त्याला आरामदायी वाटते का, त्याची माहिती मिळते.
- प्राण्यांना नव्या वातावरणात काही वेगळं वाटत असेल, काही त्रास असेल तर ते लक्षात येण्यासाठी त्यांच्या हालचाली जाणल्यानं माहिती मिळते.
- या जीपीस टॅगद्वारे प्रसारित होणारे इलेक्ट्रॉनिक सिग्नल उपग्रह सहजपणे शोधू शकतात.
- कॉलर आयडीच्या मदतीने केवळ प्राण्याचे ठिकाणच नाही तर त्याची शारीरिक स्थिती किंवा त्यात होणारे बदल यांचीही माहिती गोळा करता येते. यामुळ कॉलर आयडी उपयुक्त ठरेल.
- आरोग्य डेटाच्या आधारे, आवश्यक असल्यास उपचार किंवा मदत जनावरांना पाठविली जाऊ शकते.
आहे
कुनोमधील इतर प्राण्यांवरही कॉलर आयडी का?
- कुनोमध्ये बिबट्या आणि हायना देखील आहेत, जे चित्त्यांना हानी पोहोचवू शकतात.
- प्रशासनाने १० बिबट्या आणि १० हायनांवर रेडिओ कॉलर आयडी बसवला आहे.
- चित्त्यांभोवती त्यांची वागणूक आणि वर्तन जाणून घेता येईल.
- चित्त्यांच्या सुरक्षेला धोका पोहचू नये, यासाठी ते आवश्यक आहे.