मुक्तपीठ टीम
मुंबईसह ठाणे आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस पडला. शुक्रवारी दुपारनंतरही ठाण्यात पावसाचा मुक्काम कायम होता. त्यामुळे ठाण्यातील सखलभागात पाणी साचण्यास सुरुवात झाली. मात्र मुंबईची तुंबई होणाऱ्या या पावसात माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारने बसवण्यात आलेल्या भूमिगत टाक्यांमुळे पाणी साचले नाही. यावरूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईत पाणी तुंबले नाही, पण ठाण्यात मात्र अनेक ठिकाणी पाणी तुंबले असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी काय उत्तर दिले जाणून घेऊया….
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईत पाणी तुंबले नाही, पण ठाण्यात मात्र अनेक ठिकाणी पाणी तुंबले असा प्रश्न विचारण्यात आला.
- यावर मुख्यमंत्री हसले आणि प्रसारमाध्यमांना उत्तर दिले.
- ते म्हणाले की, पाऊस खूप जोरात पडतोय.
- सगळी यंत्रणा काम करतेय. फिल्डवर आहेत.
- जिथे जिथे नुकसान झाले असेल, त्याची दखल सरकार गांभीर्याने घेईल.
विरोधकांच्या टीकेला योग्य वेळी उत्तर देऊ!!
- विरोधी पक्षाला आता केवळ टीका करण्यावाचून दुसरे काहीच काम उरलेले नाही.
- आम्ही आमचे काम करत आहोत.
- टीकेला टीकेने उत्तर न देता आणि आमच्या कामाने विरोधकांना उत्तर देऊ.
- म्हणूनच सुरुवातीच्या केवळ दोन महिन्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
- विरोधकांच्या टीकेला योग्य वेळी उत्तर देऊ.
- आता त्यावर जास्त भाष्य करणार नाही.