मुक्तपीठ टीम
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने महाराष्ट्र आणि गोवा राज्य, तसेच दादरा, नगर हवेली आणि दीव-दमण या केंद्रशासित प्रदेशातील खाण कामगारांच्या पाल्यांसाठी असलेल्या शैक्षणिक सहाय्यता शिष्यवृत्तीत चालू शैक्षणिक वर्ष म्हणजेच २०२२-२३ साठी वाढ केली आहे.
https://scholarships.gov.in या राष्ट्रीय स्कॉलरशिप पोर्टलवर वाढीव शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु झाली आहे. विडी कामगार, चूना आणि डोलोमाईट, लोह-मँगनीज खाणीतील मजुरांच्या पाल्यांसाठी पहिली ते चौथी १ हजार रुपये, पाचवी- आठवी १५०० रुपये, इयत्ता नववी-दहावीसाठी २ हजार रुपये, अकरावी-बारावीसाठी ३ हजार रुपये, आयटीआय, पॉलिटेक्निक, बी एस्सी कृषीसह इतर पदवीसाठी ६ हजार रुपये आणि बी.ई., एमबीबीएस, एमबीएसाठी २५ हजार रुपये अशी शिष्यवृत्ती मिळेल. पूर्व-मॅट्रिक साठीच्या ऑनलाईन अर्जासाठी ३० सप्टेंबरपर्यंत आणि दहावीनंतरच्या अभ्यासक्रमासाठीच्या ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्जासाठी ३१ ऑक्टोबर पर्यंत मुदत आहे.
ऑनलाईन अर्जातील अडचणी, शिष्यवृत्तीसंबंधी सविस्तर माहितीसाठी श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या नागपूर कल्याण आयुक्तालयात ०७१२-२५१०२०० या दूरध्वनी क्रमांकावर किंवा wcngp-labour[at]nic[dot]in या ई-मेलवर संपर्क करण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.