Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत ९०च्या दशकात होतं तसं अंडरवर्ल्ड आता दिल्लीत फोफावलं! दहशतवाद्यांशीही संबंध!!

September 13, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
nia starts action against delhi underworld

मुक्तपीठ टीम

मुंबई म्हटलं की अंडरवर्ल्ड आठवतंच. त्यातही नव्वदच्या दशकात अंडरवर्ल्डची दहशत पराकोटीची वाढली होती. मोठी लग्न, नवी गाडी, घर, धंद्यात फायदा, काहीही घडलं तर अंडरवर्ल्ड खंडणी मागत असे. रस्त्यावर रक्ताचे सडे पडत. तसंच अंडरवर्ल्ड आता दिल्लीत फोफावलं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने सोमवारी दिल्ली आणि लगतच्या राज्यांमधील गुंड आणि त्यांच्या साथीदारांवर मोठी कारवाई केली आहे. त्याचं कारण या माफिया गुंडांचे दहशतवाद्यांशीही संबंध असल्याचं उघडकीस आलं आहे.

गायक मुसेवाला खून प्रकरणी एनआयएने ५० ते ६० ठिकाणी छापेमारी केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने उचललेले हे पाऊल दिल्ली-एनसीआरमधील संघटित गुन्हेगारीविरोधातील पहिली धोरणात्मक कारवाई म्हणून पाहिले जात आहे. सोमवारी सकाळी एनआयए अधिकाऱ्यांनी नीरज बवाना आणि सुनील मान उर्फ ​​टिल्लू ताजपुरिया यांसारख्या दिल्लीतील गुंडांच्या घरांवर छापे टाकले. अनेक जणांना अटक करण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे.

दिल्लीत पाच माफिया टोळ्यांची दहशत!

  • दिल्लीत मुंबईत होते तसे अंडरवर्ल्ड डॉन नाहीत, पण कायद्याला फाट्यावर मारणारे अनेक गुंड आहेत.
  • दिल्लीचे हे गुंड समोरच्याला मारण्यात कसलीही दयामाया दाखवत नाहीत.
  • ते तुरुंगात किंवा कोर्टाच्या आवारातही गोळीबार करतात.
  • केवळ विरोधातील गुंडच नाही, तर त्यांच्या कुटुंबीयांनाही आपले लक्ष्य करतात.
  • पोलिसांवरही गोळ्या झाडायला ते मागेपुढे पाहत नाही.
  • आजकाल त्याचे फॅन फॉलोअर्सही मोठ्या संख्येने सोशल मीडियावर दिसू लागले आहेत.

दिल्लीतील पाच मोठे गुंड

  • दिल्लीत पाच मोठ्या माफिया टोळ्यांची भीती आहे.
  • त्यात नीरज बवाना, सुनील मान उर्फ ​​टिल्लू ताजपुरिया, कला जथेडी, जितेंद्र गोगी आणि लॉरेन्स बिश्नोई-गोल्डी ब्रार यांचा समावेश आहे.

कारवाईला कारण ठरले लॉरेन्स बिश्नोई-गोल्डी ब्रार!

  • लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांनी सुरुवातीला पंजाबमध्ये त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरू केल्या, पण जितेंद्र गोगी आणि काला राणा टोळीच्या दिल्लीतील गुंडांशी सहकार्य केल्यानंतर त्यांनी दिल्लीपर्यंत त्यांचे नेटवर्क विस्तारले.
  • पंजाबमधील मानसा जिल्ह्यात २९ मे रोजी पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येप्रकरणी या दोघांची नावे समोर आली आहेत.
  • लॉरेन्स बिश्नोई दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद होता आणि त्याचा सहकारी गोल्डी ब्रार कॅनडातून एक टोळी चालवतो.
  • फक्त तीन दिवसांपूर्वी, दिल्ली पोलिसांनी बिष्णोई-ब्रार टोळीच्या तीन सदस्यांना अटक केली, जे ब्रार यांच्या सूचनेनुसार दिल्लीत आले होते.

Tags: delhimumbaiSiddhu MusewalaUnderworldअंडरवर्ल्डदिल्लीमुंबईसिद्धू मूसेवाला
Previous Post

स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास मातृभाषेतून प्राधान्याने उपलब्ध करणार – सुधीर मुनगंटीवार

Next Post

डॉ. आंबेडकर आणि मातंग परिषदांचा दस्तऐवज सामाजिक समतेच्या चळवळीचा दीपस्तंभ! – धम्मज्योति गजभिये

Next Post
BARTI OFFICE

डॉ. आंबेडकर आणि मातंग परिषदांचा दस्तऐवज सामाजिक समतेच्या चळवळीचा दीपस्तंभ! - धम्मज्योति गजभिये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!