Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नांदेडमध्ये तरुणावर जीवघेणा जातीय हल्ला, मध्यस्थी करणारा तरुण गंभीर जखमी

February 26, 2021
in कायदा-पोलीस
0
nanded

मुक्तपीठ टीम

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील शिवणी जामगा गावात जातीय हिंसाचाराची घटना घडली आहे. तेथील एका तरुणाला काहींनी जातीय शिवीगाळ करत मारहाण केली. मध्यस्थी करणाऱ्या दुसऱ्या तरुणावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला असून. दोन आरोपींना अटक झाली असली तरी सर्वच आरोपींना अटक करून गंभीर जखमी पीडितावर चांगला इलाज करण्याची मागणी करण्यात येत आहे.

 

शिवणी जामगा ता. लोहा येथील संदीप दुधमल नेहमी प्रमाणे शेतात काम करूण आपल्या दुचाकीवर घरी जात असतांना रस्त्यात बसवेश्वर बोंमनाळे व प्रल्हाद जामगे यांनी संदीप दुधमल यांच्या दुचाकीला धडक मारुन संदीपशी वाद घातला. यावेळी त्या दोघांनी संदीपला जाती वाचक शिवीगाळ करून मारहाण केली.

 

एवढ्यावर न थांबता प्रल्हाद आणि विश्वनाथ जामगे, यादोजी जामगे, आप्पाराव जामगे, काशिनाथ जामगे, ज्ञानोबा जामगे दशरथ जामगे, सुदाम जामगे यांनी संदीप दुधमलच्या घरी जाऊन त्याच्या आई-वडील,चुलता-चुलती, भाऊ-बहीण यांना घरात घुसून मारहाण केली. ही मारहाण सुरू असताना हे भांडण सोडवायला गेलेल्या गणेश एडके यांना डोक्यामध्ये कुऱ्हाडीचा घाव घालून खाली पाडण्यात आले. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर गावात तणाव पसरला आहे. पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

 

हाणामारीचा व्हीडिओ व्हायरल
हाणामारीचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे. या घटनेमुळे शिवणी जामगा शिवारात प्रचंड तणाव असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय.

 

पँथर सेनेची मागणी
ऑल इंडिया पँथर सेनेने या घटनेचा निषेध केला आहे. बौद्ध बांधव या राज्यात सुरक्षित नाही, असा आरोप करून तात्काळ सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच जखमी पीडित गणेश एडकेंवर चांगल्या दवाखान्यात इलाजाची मागणीही केली आहे.


Tags: क्राईमदीप दुधमलनांदेडशिवणी
Previous Post

*मनोरंजन महत्त्वाचं*: १) मराठी अभिनयसृष्टीमधील अभिनेता सुव्रत जोशी आणि सखी गोखले यांनी नुकतीच सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये एक व्हिडीओ शेअर केला असून ‘काल आमच्या दोघांमध्ये तिसरी आली’ असे कॅप्शन दिले आहे. ही तिसरी म्हणजे त्यांची नवी कार आहे. २) अभिनेत्री जान्हवी कपूरने सध्या सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोत परिधान केलेल्या ड्रेसने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. जान्हवीने परिधान केलेल्या या ड्रेसची खरी किंमत $३,८०० म्हणजेच २ लाख ७५ हजार २१७ रूपये इतकी आहे. त्यामुळे तो चर्चेचा विषय आहे. ३) अतिशय लोकप्रिय असलेला शो ‘बिग बॉस १४’मध्ये राखी सावंतचा सहभाग होता. तिने १४ लाख रुपये घेऊन फिनालेमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तिची आई हॉस्पिटलमध्ये कॅन्सवर उपचार घेत असल्याचे सांगितले. राखीने नुकताच तिच्या इन्स्टाकग्राम अकाऊंटवर आईसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये राखीची आई ज्यांनी कोणी मदत केली आहे त्यांचे आणि सलमानचे आभार मानताना दिसत आहे. ४) अभिनेता सोनू सूद हा त्याच्या वेगवेगळ्या कामगीरींनी नेहमीच चर्चेत असतो. आता सोनूने पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणाऱ्या ग्रामस्थांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ५) आता यशोमान आपटे पहिल्यांदाच म्युझिक अल्बममध्ये झळकणार आहे. फुलपाखरू मालिकेतून प्रसिद्ध झालेला अभिनेता यशोमान आपटे, ‘नको रुसवा नको दुरावा, सतत वाटे तू इथे जवळी रहा’ या नव्या म्युझिक अल्बममध्ये दिसणार आहे.

Next Post

शेतकऱ्यांसाठी मृद व जलसंधारणची संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाईन

Next Post
bhuse

शेतकऱ्यांसाठी मृद व जलसंधारणची संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाईन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!