मुक्तपीठ टीम
ब्रिटिश महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर भारतातील कोहिनूर हिरा परत करण्याची मागणी ट्विटरवर केली जात आहे. ट्विटरवर हा वाद-आक्रोश चिघळत चालला आहे. ट्विटरवरील अनेक यूजर्स कोहिनूर भारतात परत आणण्याची मागणी करत आहेत. एलिझाबेथ यांचा मुलगा प्रिन्स चार्ल्सच्या राज्याभिषेकासोबतच १०५ कॅरेटचा बहुमोल कोहिनूर हिरा त्याची पत्नी कॅमिला हिच्या डोक्यावरील मुकुटावर सजवला गेला.
ट्विटरवर हिऱ्याच्या परतीसाठी अतिशय गांभीर्याने युक्तिवाद करत आहेत, तर काहीजण याचा विनोद करत आहेत.
ट्विटर युजर्सचा कोहिनूर मागणीवरून विनोद सुरू
- एका ट्विटर युजरने धूम २ चित्रपटाची क्लिप पोस्ट केली आणि लिहिले, कोहिनूर भारतात परत आणण्यासाठी हृतिक रोशन निघाला आहे.
- त्याचवेळी गोमती नावाच्या युजरने लिहिले की, आम्ही आता आमचा कोहिनूर परत घेऊ शकतो का?
- आशिष राज यांनी लिहिले की, “दु:खाने, राणी आता राहिल्या नाही. आता आपण कोहिनूर परत भेटण्याची आशा करू शकतो का? असो, कोहिनूर हिसकावून घेतला, तो कोणी हव्यासापोटी दिला नाही.
केंद्र सरकारच्या मते हिरा हिसकावलेला नाही…
कोहिनूरच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात म्हटले आहे की सुमारे २० कोटी डॉलर किंमतीचा हा हिरा जबरदस्तीने हिसकावण्यात आलेला नाही किंवा चोरीला गेला नाही, तर शीख संस्थानाच्या वतीने एका करारानुसार तो ईस्ट इंडिया कंपनीला देण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, हा हिरा जगातील सर्वात मोठा हिरा होता. त्याचा उगम गुंटूर येथील खाणीतून झाला. १३व्या शतकात हा काकतिया घराण्याचा वारसा होता, जो नंतर अलाउद्दीन खिलजीने लुटला आणि अशा प्रकारे मुघल साम्राज्याचा भाग बनला. पर्शियन लुटारू नादिरशहासोबत अफगाणिस्तानात पोहोचले. नादिरशहाने त्याला कोहिनूर असे नाव दिले. लाहोरच्या शीख संस्थानाचा ब्रिटिश सैन्याने पराभव केला तेव्हा हा हिरा इंग्लंडला गेला.