मुक्तपीठ टीम
तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरू होणारी राहुल गांधींची भारत जोडो यात्रा काँग्रेससाठी भारतीय राजकारणाचा ‘टर्निंग पॉइंट’ ठरू शकते. राहुल गांधी यांच्यासाठी ही यात्रा खूपच कठीण जाणार आहे. राहुल गांधी इतर नेत्यांसोबत कन्याकुमारी ते काश्मीर असा ३,५७० किलोमीटरचा प्रवास करणार आहे. या दरम्यान ते ५ स्टार हॉटेलमध्ये झोपणार नाही तर कंटेनरमध्ये झोपणार आहे.
राहुल गांधी कंटेनरमध्ये झोपणार!!
- राहुल गांधी त्यांच्या दौऱ्यादरम्यान ज्या कंटेनरमध्ये राहतील त्या कंटेनरमध्ये झोपण्याचे बेड, टॉयलेट आणि एअर कंडिशनर लावण्यात आले आहेत.
- सुमारे ६० कंटेनरची व्यवस्था करून कन्याकुमारीकडे रवाना करण्यात आली आहे.
- रात्रीच्या विश्रांतीसाठी कंटेनर दररोज नवीन ठिकाणी उभे केले जातील.
राहुल गांधी रस्त्यावर भोजन करणार…
- राहुल गांधी इतर सर्व नेत्यांसोबत रस्त्यावर भोजन करतील.
- सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन प्रवाशांच्या तुकड्या असतील.
- सकाळची बॅच सकाळी ७ ते १०.३० आणि सायंकाळची बॅच दुपारी ३.३० ते ६.३० या वेळेत चालेल.
- दररोज सुमारे २२ ते २३ किमी चालण्याचे नियोजन आहे.
- संध्याकाळची बॅच विस्तारित असणार असून त्यात लोकसहभाग पाहायला मिळणार आहे.
- भारत जोडी यात्रा या 20 प्रमुख ठिकाणांहुन रवाना होईल, ज्यात कन्याकुमारी, तिरुवनंतपुरम, कोची, निलांबूर, म्हैसूर, बेल्लारी, रायचूर, विकाराबाद, नांदेड, जळगाव जामोद, इंदूर, कोटा, दौसा, अलवर, बुलंदशहर, दिल्ली, अंबाला, पठाणकोट, जम्मू, श्रीनगर यांचा समावेश आहे.
- काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल आणि जयराम रमेश यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि प्रवासी संघटना समितीचे प्रभारी दिग्विजय सिंह यांनी ‘महात्मा गांधी मंडपम’जवळ तयारीचा आढावा घेतला.
- जयराम रमेश हे प्रसारमाध्यमांशी बोलताना समोर आले की, देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
- या यात्रेच्या मार्गावर न येणाऱ्या राज्यांमध्ये काँग्रेस ५० किंवा १०० किलोमीटरच्या छोट्या यात्रेचे आयोजन करेल.
- आर्थिक विषमता, सामाजिक ध्रुवीकरण यातून मोडत असलेल्या भारताला एकत्र आणणे हा या यात्रेचा उद्देश आहे.
राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा उद्देश काय?
राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा उद्देश काय?