मुक्तपीठ टीम
भारतातील सर्वाधिक वेगाने वाढत असलेली इंटरनेट व्यापार कंपनी मीशोने आपल्या “मेगा ब्लॉकबस्टर सेल” ची घोषणा आज केली. मीशोवरील हा मोठा फेस्टिव्ह सेल २३ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत सुरु राहणार आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीला ई-कॉमर्स अर्थात इंटरनेटच्या माध्यमातून खरेदी-विक्रीचे लाभ मिळवून देण्याचे आपले मिशन पुढे नेण्यासाठी मीशो देशभरातील ग्राहकांसाठी ई-कॉमर्सला अधिकाधिक सहजसोपे व किफायतशीर बनवत आहे.
३० वेगवेगळ्या विभागांमध्ये ७ लाखांहून जास्त विक्रेते आणि ~६.५ कोटी सक्रिय उत्पादन लिस्टिंग्ससह मीशो आपल्या ग्राहकांना विविध प्रकारची उत्पादने, कमीत कमी किमतींना सहज खरेदी करण्याची सुविधा देण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन कार्यरत आहे. मीशोला हे ठाऊक आहे की, भारतात अनेक लोक असे आहेत ज्यांच्या उत्पादने निवडण्याच्या आणि उत्पादनांच्या किमतींबाबतच्या गरजा वेगळ्या असतात आणि त्या गरजा आजवर पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत. संपूर्ण भारताच्या सणासुदीच्या खरेदीशी संबंधित सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी ही कंपनी या युजर्सवर आपले लक्ष केंद्रित करते. यंदाच्या वर्षीच्या फेस्टिव्ह सेलच्या आधी मीशोने क्षेत्रीय स्तरावरील आपले स्थान अधिक मजबूत करत आपल्या ऍपवर बंगाली, तेलुगु, मराठी, तमिळ, गुजराती, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या आठ भाषांचा समावेश केला आहे. गेल्या वर्षी पाच दिवसांच्या वार्षिक सेलमध्ये ~६०% ऑर्डर्स ४+ स्तरांच्या क्षेत्रांमधून आल्या होत्या.
मीशोवर आपली उत्पादने विकणाऱ्यांनी गेल्या दोन वर्षात आपल्या व्यवसायामध्ये सरासरी ८२% ची वाढ अनुभवली आहे. सणासुदीचा काळ सुरु झाला आहे, त्यासाठी मीशोने आपल्या विक्रेत्यांना व्यापारामध्ये मागणीचे पूर्वानुमान आणि ऑर्डरच्या व्हॉल्युमचे व्यवस्थापन अशा अनेक पैलूंबद्दल माहिती देणे सुरु केले असून मीशो त्यांच्यासोबत अतिशय जवळून काम करत आहे. सप्लायर लर्निंग हबवर शैक्षणिक इन्फोग्राफिक्स आणि अतिशय सहजसोप्या व्हिडियोंचा समावेश असलेला एक मोठा ट्रेनिंग प्रोग्राम कंपनीने तयार केला आहे. सेलच्या दृष्टीने सर्वात चांगल्या गोष्टी, कॅटलॉग्सची निवड या सर्व गोष्टींची माहिती या व्हिडीओमध्ये दिली जाते. याचा परिणाम म्हणून फेस्टिव्ह सेलमध्ये लघु उद्योजकांचा सहभाग गेल्या वर्षीपेक्षा ४ पटींनी वाढला आहे.
मीशोचे सीएक्सओ, बिझनेस श्री उत्कृष्ट कुमार यांनी सांगितले, “भारतातील ग्राहकांच्या गरजा, इच्छा, आवडीनिवडी आणि सणासुदीच्या काळात खरेदीच्या पॅटर्न्स यांना बारकाईने समजून घेत मीशोचा मेगा ब्लॉकबस्टर सेल अतिशय विचारपूर्वक तयार केला जातो. भारतभरातील ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही देशभरातील लाखो विक्रेत्यांसोबत काम करत आहोत. त्यांच्यापैकी अनेक विक्रेते असे आहेत जे या सणासुदीच्या हंगामात पहिल्यांदाच आपली उत्पादने ऑनलाईन विकणार आहेत. मीशोवर आम्ही असा प्लॅटफॉर्म तयार करत आहोत जो देशभरातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना खूप मोठी वाढ आणि खूप जास्त मार्जिन्स मिळवून देईल आणि आपल्या व्यापाराचे डिजिटलीकरण करून मीशोवर यशस्वी होण्याचा आत्मविश्वास देखील त्यांना प्रदान करेल.
पुढील बिलियन भारतीयांसाठी सर्वात पहिले शॉपिंग डेस्टिनेशन म्हणून मीशोचे स्थान अजून जास्त मजबूत करण्यासाठी आम्ही आमचा वार्षिक मेगा ब्लॉकबस्टर फेस्टिव्ह सेल सुरु करत आहोत. ‘युजर सर्वात आधी’ हा विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही लघु उद्योजकांची उत्पादने जास्तीत जास्त उपलब्ध करवून देऊ, देशाच्या कानाकोपऱ्यांमधील ग्राहकांसाठी उत्तम दर्जाची उत्पादने कमीत कमी किमतींना सादर करू.”
यावर्षी मीशोने देशभरातील नऊ प्रसिद्ध सेलिब्रेटींसोबत हातमिळवणी केली आहे, यामध्ये रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, रोहित शर्मा, रश्मिका मंदाना, कपिल शर्मा, तृषा कृष्णन, कार्थी शिवकुमार, राम चरण आणि सौरव गांगुली यांचा समावेश आहे. मीशोच्या वैशिष्ट्यांची माहिती देशभरातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यात हे सेलिब्रेटी कंपनीसोबत काम करतील. यापैकी प्रत्येक सेलिब्रेटी एका नव्या आणि मनोरंजक अवतारात पाहायला मिळेल. आपापल्या क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करत, वेगवेगळ्या उत्पादनांच्या विक्रेत्यांच्या भूमिकांमध्ये भारतातील विविध क्षेत्रांमधील ग्राहकांपर्यंत ब्रँडचा संदेश पोहोचवण्यात हे सेलिब्रेटी योगदान देतील.
मीशोने आपल्या ग्राहकांना पेमेंटवर देखील आकर्षक ऑफर्स आणि इन्स्टंट बँक डिस्काऊंट्स मिळवून देण्यासाठी काही प्रमुख वॉलेट्ससोबत देखील सहयोग केला आहे. यामध्ये फोनपे आणि पेटीएम इत्यादींचा समावेश आहे. याशिवाय सिम्प्ल आणि लेझीपेमार्फत ‘बाय नाऊ पे लेटर’ वर विशेष ऑफर्स देखील उपलब्ध आहेत.