मुक्तपीठ टीम
आयकर विभागाने आता राजकारणातील छोट्या पक्षांच्या मोठ्या घोटाळ्यांना लक्ष्य केलं आहे. महाराष्ट्रासह ५-६ राज्यांमध्ये घातलेल्या छाप्यांमध्ये अशा पक्षांच्या माध्यमातून चालणारं करचुकवेगिरीचं रॅकेट उघड झालं आहे. आधी राजकीय पक्ष म्हणून मोठी देणगी घ्यायची आणि मग ती रोख रकम स्वरुपात कमिशन कापून परत करायची, अशी या छोट्या राजकीय पक्षांपैकी काहींची मोडस ऑपरेंडी असल्याच्या तक्रारींनंतर आयकर विभागाने ही कारवाई केली आहे.
देणगी, रोकड आणि राजकारण!
- ही आयकर कारवाई छोट्या राजकीय पक्षांश संबंधित काहीवर झाली आहे.
- ज्यांनी लोकांकडून देणगी घेतली आणि नंतर रोख रक्कम परत केली.
- नोंदणीकृत राजकीय पक्षांना दिलेल्या देणगीमुळे करदात्यांना सवलत मिळते.
- पण प्रत्यक्षात त्यांनी दिलेली देणगी हे राजकीय पक्ष रोख स्वरुपात परत करून कमिशन मिळवत.
- निवडणूक आयोगाच्या अहवालानंतर आयकर विभागाने कारवाई केली आहे, अशी चर्चा आहे.
या राज्यांमध्ये आयकर विभागाची छापे मारी…
- गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा आणि इतर काही राज्यांमध्ये शोधमोहीम सुरू आहे.
- नोंदणीकृत पण जास्त माहिती नसलेले राजकीय पक्ष आणि त्यांच्या संलग्न संस्था, एन्ट्री लेव्हल ऑपरेटर आणि इतरांविरुद्ध प्राप्तिकर विभागाने कारवाई सुरू केली आहे.
नोंदवलेले पक्ष पण प्रत्यक्षात अस्तित्व कागदावरच!
- निवडणूक आयोगाच्या अहवालानंतर प्राप्तिकर विभागाने कारवाई केली आहे.
- RUPP यादीतील ८७ संस्थांना प्रत्यक्ष पडताळणीदरम्यान अस्तित्वात नसल्याचा आढळून आल्याने त्यांची नावे काढून टाकली आहेत.
- निवडणूक आयोगाने जाहीर केले होते की ते नियम आणि निवडणूक कायद्यांचे उल्लंघन केल्याबद्दल २,१०० नोंदणीकृत अपरिचित राजकीय पक्षांवर कारवाई करत आहेत.
- सर्व राजकीय पक्षांना आर्थिक योगदान भरण्याबाबत त्यांचे पत्ते आणि पदाधिकाऱ्यांची नावे अद्ययावत करण्यात अपयश आले होते.
- यातील काही पक्ष गंभीर आर्थिक अनियमिततेत गुंतल्याचा संशय होता.