मुक्तपीठ टीम
देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरीत मेकॅनिकल विषयात पदवीधरांसाठी १० जागा, डिप्लोमाधारकांसाठी १० जागा, केमिकल विषयात पदवीधरांसाठी १० जागा, डिप्लोमाधारकांसाठी १५ जागा, इलेक्ट्रिकल विषयात पदवीधरांसाठी ०५ जागा, डिप्लोमाधारकांसाठी ०१ जागा, आयटी विषयात पदवीधरांसाठी ०३ जागा, डिप्लोमाधारकांसाठी ०१ जागा, जनरल स्ट्रीम पदवीधरांसाठी ५० जागा अशा एकूण १०५ जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १८ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण देहू रोड पुणे आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पदवीधर अॅप्रेंटिस- संबंधित विषयात इंजिनीअरिंग टेक्नोलॉजी पदवी/ जनरल स्ट्रीम पदवीधर
- डिप्लोमा अॅप्रेंटिस- संबंधित विषयात इंजिनीअरिंग/ टेक्नोलॉजी डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान १८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड, जिल्हा-पुणे, महाराष्ट्र, पिन-४१२१०१
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोडच्या अधिकृत वेबसाइट https://ddpdoo.gov.in/units/OFDR वरून माहिती मिळवू शकता.
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1lU4wcpSDj6aQ4uQiFnIr6po9ROA4fjbI/view