मुक्तपीठ टीम
बुद्ध,चार्वाक,कबीर,तुकोबा,जिजा ऊ,छत्रपती शिवाजी, संभाजी महाराज,म.फुले-सावित्री,राजर्षी शाहू,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य-विचारांची कास धरून वामनदादा कर्डक यांनी येथील शेतकरी,कामगार,कष्टकरी, मजूर,उपेक्षित वंचित घटकांच्या न्याय हक्का सोबतच भारतीय संविधानिक विचार वारसा जतन केला असून लोककवी वामनदादा कर्डकांचा तोच साहित्य-सांस्कृतिक,संविधानिक विचार-मूल्य वारसा लोकमाणसात रुजवण्याची गरज असल्याचे मत सुप्रसिद्ध शा. स्वप्नील डुंबरे यांनी मांडले.
लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक,महाराष्ट्र व देशवंडी ग्रामस्थ यांच्या वतीने कर्डकांच्या १०० जयंती अर्थात जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित संविधान शाहिरी अभिवादन सभेत ते अध्यक्ष स्थानाहुन बोलत होते.
खंडप्राय भारत देश भारतीय संविधानामुळेच अखंड उभा असून शाहिरी कवनकारांनी देशाच्या सांस्कृतिक जडणघडणीत मोलाची कामगिरी केली असून वामनदादा कर्डकांची राष्ट्रवाद आणि भांडवलशाही, जागतिकीकरण,बाजारीकरण यावरील काव्य प्रतिभा चिकित्सक पद्धतीने अभ्यासली जावे,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार-कार्याचा त्यांच्या शाहिरी वरील प्रभाव धम्म व संविधानिक विचार पुढे नेईल असे उद्गार यावेळी सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा.जावेद शेख यांनी बोलतांना व्यक्त केले.
लोककवी वामनदादा कर्डक यांचे विखुरलेले साहित्य,नाशिक येथे अध्यावत व सुसज्ज नूतन स्मारक,देशवंडी येथील अपूर्ण अवस्थेतील स्मारक,सिन्नर येथील नाट्यगृहाचे नामकरण, शाळा-महाविद्यालय-विद्यापीठ अभ्यासक्रमात काव्यसंग्रहाचा समावेश हे विषय आगामी काळात आमच्या अजेंड्यावर असून देशवंडी,सिन्नर येथील नागरिकांसह राज्यातील वामन प्रेमी लवकरच या करता तीव्र आंदोलन हाती घेतली असे उदगार लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानचे संस्थापक,कार्याध्यक्ष प्रा. शरद शेजवळ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
कर्डक प्रतिष्ठानचे संस्थापक, कार्याध्यक्ष शरद शेजवळ,अत्याचार विरोधी कृती समितीचे प्रमुख अँड.राहुल तुपलोंढे,वामनदादा कर्डकांचे सहकारी गणपत कटारे,धम्म व संविधान प्रचारक महेंद्र गायकवाड सर या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. देशवंडी गांवचे सरपंच दत्ताराम डोमाडे,पो.पाटील मुकेश कापडी, देविदास कर्डक,प्रवीण कर्डक, किशोर सोनवणे,विठ्ठल चकणे, भाऊराव कापडी,सुभाष कर्डक, नितीन कर्डक,संजय कर्डक,रोशन कर्डक,आनंद शिंदे,मनोहर कर्डक सतीश गवारे,शंकर कर्डक,लताबाई सोनवणे, अरुणा आंबेकर,वैशाली कर्डक, साळुबाई नागरे,सोनल कर्डक, अलका कर्डक,सखुबाई कर्डक, मनीषा कर्डक,मीना सोनकांबळे, नंदा निरभवणे,उषा गवारे आदी महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाहीर स्वप्निल डुंबरे
जगातली देखणे बाय मी भिमाची, भिमाची लेखणी।साऱ्या जगातल्या जगातल्या लेखण्या जरी दिसायला दिसायला देखण्या। काळ्या मनाच्या काळ्या साऱ्या जणी।।तुझ्या हाती तूप आलं तुझ्या हाती साय।समाज्याच काय रं गड्या,समाज्याच काय।माझी मैना गावाकडं राहिली माझ्या जीवाची होती या कायली।
ही वामनदादा व शा. अण्णाभाऊ साठे यांची संयुक्त महाराष्ट्र लावणी सादर केली.
खोपी कुपी सोडून साऱ्या माळ्या लोळविणारा मी वादळ वारा मी वादळ वारा मी वामन वाणी जातो मी वामन वाणी गातो जातो तिथे पेरीत जातो चिल्या पिल्यांना चारा मी वादळ वारा व दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्य भूमीवर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर हे गीत गायक शरद शेजवळ यांनी सादर केले. राहुल तिवारी (गायक), विशाल नन्नावरे,(गायक),निलेश टेलरे(ढोलकी), शुभम यादव(हार्मोनिम), अक्षय नन्नावरे(गायक) साथ संगत केली.
खंडप्राय भारत देश भारतीय संविधानामुळेच अखंड उभा असून शाहिरी कवनकारांनी देशाच्या सांस्कृतिक जडणघडणीत मोलाची कामगिरी केली असून वामनदादा कर्डकांची राष्ट्रवाद आणि भांडवलशाही, जागतिकीकरण,बाजारीकरण यावरील काव्य प्रतिभा चिकित्सक पद्धतीने अभ्यासली जावे,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार-कार्याचा त्यांच्या शाहिरी वरील प्रभाव धम्म व संविधानिक विचार पुढे नेईल असे उद्गार यावेळी सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा.जावेद शेख यांनी बोलतांना व्यक्त केले.
जागतिकीकरण आणि राजकीय हुकूमशाही याचा तीव्र निषेध करत संविधान साक्षरता, प्रचार प्रसार व संवर्धन करता शाहीरांनी रणी उतरावं असे आवाहन करून लोककवी वामनदादा कर्डक यांचे विखुरलेले साहित्य,नाशिक येथे अध्यावत व सुसज्ज नूतन स्मारक,देशवंडी येथील अपूर्ण अवस्थेतील स्मारक,सिन्नर येथील नाट्यगृहाचे नामकरण, शाळा-महाविद्यालय-विद्यापीठ अभ्यासक्रमात काव्यसंग्रहाचा समावेश हे विषय आगामी काळात आमच्या अजेंड्यावर असून देशवंडी,सिन्नर येथील नागरिकांसह राज्यातील वामन प्रेमी लवकरच या करता तीव्र आंदोलन हाती घेतली असे उदगार लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानचे संस्थापक,कार्याध्यक्ष प्रा. शरद शेजवळ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
कर्डक प्रतिष्ठानचे संस्थापक, कार्याध्यक्ष शरद शेजवळ,अत्याचार विरोधी कृती समितीचे प्रमुख अँड.राहुल तुपलोंढे,वामनदादा कर्डकांचे सहकारी गणपत कटारे,धम्म व संविधान प्रचारक महेंद्र गायकवाड सर या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. देशवंडी गांवचे सरपंच दत्ताराम डोमाडे,पो.पाटील मुकेश कापडी, देविदास कर्डक,प्रवीण कर्डक, किशोर सोनवणे,विठ्ठल चकणे, भाऊराव कापडी,सुभाष कर्डक, नितीन कर्डक,संजय कर्डक,रोशन कर्डक,आनंद शिंदे,मनोहर कर्डक सतीश गवारे,शंकर कर्डक,लताबाई सोनवणे, अरुणा आंबेकर,वैशाली कर्डक, साळुबाई नागरे,सोनल कर्डक, अलका कर्डक,सखुबाई कर्डक, मनीषा कर्डक,मीना सोनकांबळे, नंदा निरभवणे,उषा गवारे आदी महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रवीण कर्डक यांनी केले तर देविदास कर्डक यांनी आभार मानले.