मुक्तपीठ टीम
CNH इंडस्ट्रियलचा ब्रँड न्यू हॉलंड अॅग्रीकल्चरने ब्ल्यू सीरिज SIMBA हा नवा कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर लॉंच केला आहे. त्यातून कंपनीने भारतात सब 30HP कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर विभागात पदार्पण केल्याची घोषणा बंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या 7th EIMA अॅग्रीमॅच एक्स्पो २०२२ मध्ये केली आहे. ब्रँडच्या ब्ल्यू सीरिज श्रेणीचा एक भाग म्हणून सादर करण्यात आलेला हा ट्रॅक्टर वाईनयार्ड्स, ऑर्चर्डस्, ऊस व कापसाची शेते इत्यादींमध्ये फवारणी, मशागत आणि इंटर-रो पद्धतीने शेती करणे यासारख्या विशेष कामांसाठी डिझाईन करण्यात आला आहे. २१ ट्रॅक्टर्सचा पहिला लॉट लॉन्च प्रसंगी ग्राहकांना सुपूर्द करण्यात आला.
CNH इंडस्ट्रियलचे – भारत व SAARC चे मॅनेजिंग डायरेक्टर व कंट्री हेड रौनक वर्मा यांनी सांगितले, “सब ३०एचपी ट्रॅक्टर्सच्या या नव्या विभागात पदार्पण करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. एक कंपनी या नात्याने आम्ही आमच्या ग्राहकांना शेतीसाठीची उपकरणे व यांत्रिकीकरण सुविधांची संपूर्ण श्रेणी उपलब्ध करवून देऊ इच्छितो. ब्ल्यू सीरिज SIMBAमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांना विशेष कामांसाठी तयार करण्यात आलेल्या कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर्सची श्रेणी प्रदान करत आहोत.”
वर्मा यांनी पुढे सांगितले, “EIMA ऍग्रीमॅच ही आमच्या सध्याच्या तसेच संभाव्य ग्राहकांसोबत आमचे संबंध अधिक दृढ करण्याची व आमची उत्पादन श्रेणी प्रदर्शित करण्याची उत्तम संधी आहे. या एक्स्पोमध्ये ब्ल्यू सीरिज SIMBA 30 हा आमचा नवा ट्रॅक्टर लॉन्च करताना आम्हाला अतिशय अभिमान वाटत आहे.”
तीन सिलिंडर असलेले 29HP मित्सुबिशी इंजिन असलेला ब्ल्यू सीरिज SIMBA 30 या विभागात अधिक जास्त शक्ती आणि इंधन बचत क्षमता आणण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या ट्रॅक्टरमध्ये उच्च शक्ती आणि नॅरो ट्रॅक यांच्या मिलापाचा अनोखा लाभ मिळतो ज्यामुळे हा या विभागातील सर्वाधिक बहुउपयोगी ट्रॅक्टर ठरला आहे. या बहुउपयोगी कॉम्पॅक्ट ट्रॅक्टरमध्ये नऊ फॉरवर्ड आणि तीन रिव्हर्स गियर्स आहेत, त्याशिवाय साईड शिफ्ट ट्रान्समिशन मोड्स, ऑइल-इमर्स्ड ब्रेक्स, ७५० किलो हायड्रॉलिक लिफ्ट क्षमता आणि ऑटोमॅटिक डेप्थ अँड ड्राफ्ट कंट्रोल (ADDC) ही वैशिष्ट्ये यामध्ये असल्याने या ट्रॅक्टरचा वापर करून सर्व प्रकारची कामे अगदी सहजपणे करता येऊ शकतात.
या ट्रॅक्टरमध्ये श्रेणीतील सर्वोत्तम एर्गोनॉमिक्स, सेमी-फ्लॅट प्लॅटफॉर्म, फ्लोअर मॅट आणि जास्तीत जास्त अनुकूलित ऑपरेटर सीट उंचीसह हीट शील्ड आहे. यामध्ये एक न्यूट्रल सेफ्टी स्विच आणि डिफरन्शियल लॉक आहे जे ट्रॅक्टरची हालचाल सुरक्षितपणे व कोणत्याही स्थितीमध्ये आणि सर्व पृष्ठभागांवर सहजपणे करण्यात मदत करते. ब्ल्यू सीरिज SIMBA 30 मध्ये चारचाकी ड्राइव्ह फ्रंट ऍक्सल असून ऍडजस्टेबल रिम टायर पर्याय असल्याने मशीनची एकंदरीत रुंदी कमी होते. ट्रॅक्टरची देखभाल सहजपणे करता यावी यासाठी यामध्ये ड्राय टाईप एअर क्लीनर, क्लॉगिंग सेन्सर आहे, जेव्हा एअर फिल्टर गाळ अडकल्याने बंद होतो तेव्हा ऑपरेटरला त्याची सूचना या सेन्सरमार्फत दिली जाते.
संपूर्णपणे नवीन ब्ल्यू सीरिज SIMBA 30 ही सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटकात न्यू हॉलंड ऍग्रीकल्चर डीलरशिप्समध्ये उपलब्ध आहे आणि लवकरच इतर बाजारपेठांमध्ये देखील उपलब्ध होईल.
ऍग्रीमॅच एक्स्पोमध्ये न्यू हॉलंड ऍग्रीकल्चरने अत्याधुनिक शेती उपकरणे देखील प्रदर्शित केली आहेत, यामध्ये ट्रॅक्टर्स आणि यांत्रिकीकरण सुविधांचा समावेश आहे. १ ते ३ सप्टेंबर २०२२ या कालावधीत स्टॉल क्रमांक OD7 ला हे पाहता येईल. ब्ल्यू सीरिज SIMBA 30 बरोबरीनेच न्यू हॉलंडच्या इतर ब्रँडेड उत्पादनांमध्ये एक्सेल 4710, 3600-2 ऑल-राउंडर आणि एक्सेल अल्टीमा 5510 ट्रॅक्टर्स, TC5.30 कम्बाईन हार्वेस्टर, RKG 129 रेक आणि BC 5060 स्क्वेअर बेलर यांचा समावेश आहे.