मुक्तपीठ टीम
देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पोलीस आणि शिक्षकांचं लसीकरण पार पडलं. कोरोना लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. आता “१ मार्चपासून ६० पेक्षा जास्त वय असणाऱ्या आणि इतर व्याधी असणाऱ्या ४५ वर्षांहून अधिक वय असणाऱ्या नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे”,अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
या लसीकरणाबद्दल सांगताना जावडेकर म्हणाले की, “ही लसीकरण मोहिम १० हजार सरकारी आणि २० हजार खाजगी केंद्रांवर पार पडणार आहे. तसेच लस मोफत दिली जाणार असून पूर्ण खर्च सरकार उचलणार आहे. पण ज्यांना खाजगी रुग्णालयातून लसीकरण करुन घ्यायाचे आहे, त्यांना मात्र पैसे मोजावे लागतील. तर किती पैसे मोजावे लागतील याचा निर्णय पुढील काही दिवसात घेतला जाईल. यासंबंधी लसनिर्माण करणाऱ्या कंपनीशी चर्चा सुरु आहे”.
From 1st of March, people over 60 years of age or over 45 with comorbidities will be able to get vaccinated at 10,000 Government facilities and many private hospitals. #CabinetDecisions pic.twitter.com/M6x2cfu7au
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) February 24, 2021
कमी झालेली कोरोना रुग्णांची संख्या काही दिवसांपासून पून्हा वाढू लागल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून विविध राज्यांमध्ये तीन सदस्यीय पथके पाठवण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. तसेच गुजरात, कर्नाटक, केरळ, पंजाब, जम्मू आणि काश्मिरमध्येही हे पथक धाडण्यात आले आहे.