मुक्तपीठ टीम
नाशिक आणि मालेगावात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदावर नाशिकमध्ये १०६ जागा तर, मालेगावात १४ जागा आहेत, पुरूषांसाठी एमपीडब्ल्यू पदावर नाशिकमध्ये १०६ जागा आणि मालेगावात १४ जागा आहेत, महिलांसाठी स्टाफ नर्स पदासाठी नाशिकमध्ये ९५ जागा आणि मालेगावात १३ जागा आहेत, पुरूषांसाठी स्टाफ नर्स पदावर नाशिकमध्ये ११ जागा आणि मालेगावात ०१ जागा आहे. अशा एकूण ३६० जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०६ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण नाशिक आणि मालेगाव आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- एमबीबीएस
- पद क्र.२- १) विज्ञान विषायातून १२वी उत्तीर्ण २) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
- पद क्र.३ आणि ४- जीएनएम/ बीएससी नर्सिंग केलेलं असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या वर्गातील उमेदवारांकडून १५० रूपये शुल्क आकारले जाणार तर, मागासवर्गीय उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण
आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, त्र्यंबकरोड, नाशिक
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागच्या अधिकृत वेबसाइट https://arogya.maharashtra.gov.in/1035/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%aa%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a0 वरून माहिती मिळवू शकता.
अधिकृत जाहिरात
नाशिक: https://drive.google.com/file/d/1kBu-iE7259TlKU5PN4ilMPj_05nmpZhF/view
मालेगाव: https://drive.google.com/file/d/11KbwT01FyEBxuKjbKyCdJuiFqEYhprMS/view