Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बिल्किस बानोंच्या दोषींची सुटका: सर्वोच्च न्यायालयाकडून गंभीर दखल, सुटका करताना बुद्धीचा वापर केला की नाही?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
SC On Bilkiss

मुक्तपीठ टीम

बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील ११ दोषींच्या सुटकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला नोटीस बजावली आहे. तसेच दोषींची सुटका करताना बुद्धीचा वापर झाला की नाही हे पाहावे लागेल असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दोषींनाही त्यांची बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा, न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि विक्रम नाथ यांच्या खंडपीठासमोर पार पडली. हे प्रकरण दोन आठवड्यांनंतर पुन्हा सुनावणीसाठी घेण्यात येणार आहे.

बिल्किस बानोच्या बलात्काराच्या दोषींच्या सुटकेबाबत सर्वोच्च न्यायालय कठोर निर्णय घेऊ शकते, हे सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवरून स्पष्ट झाले आहे. खटल्याच्या सुनावणीदरम्यान, दोषींच्या वकिलांनी न्यायालयाला विनंती केली होती की ही याचिका कायम ठेवण्यायोग्य आहे की नाही हे प्रथम त्यांचे युक्तिवाद ऐकून घ्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाने तसे करण्यास नकार दिला. सीपीएम नेत्या सुभाषिनी अली, पत्रकार रेवती लाल आणि कार्यकर्त्या रूप रेखा राणी यांनी बिल्किस बानोच्या दोषींच्या सुटकेविरोधात अर्ज दाखल केला होता. गुजरात सरकारने गेल्या आठवड्यात बिल्किस बानोवरील बलात्काराच्या ११ दोषींची सुटका केली होती. त्यावर गुजरातसह देशभरात प्रश्न उपस्थित झाले असून निदर्शनेही होत आहेत.

नेमकं काय आहे बिल्किस बानो प्रकरण ?

  • २००२ साली गुजरात दंगलीमधील बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ११ दोषींची सुटका करण्यात आली.
  • गोध्रा येथील कारागृहात हे ११ दोषी शिक्षा भोगत होते. जन्मठेपेची शिक्षा माफ व्हावी असा अर्ज या दोषींनी केला होता.
  • गुन्हेगारांचे वय, गुन्ह्याचे स्वरुप, तुरुंगातील त्यांची वागणूक या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्यांची सुटका करण्यात आली आहे.
  • या दोषींच्या सुटकेबद्दल एक समिती स्थापन करण्यात आली.
  • समितीने दिलेल्या निर्णयानुसार कार्यवाही करण्यात आली.
  • यामध्ये २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने २००२च्या गुजरात दंगलीतल्या बिल्किस बानो प्रकरणात त्यांना ५० लाख रुपये नुकसान भरपाई, सरकारी नोकरी आणि घर देण्याचे आदेश सरकारला दिले गेले होते.

Tags: bilkis Banogang rapeGujrat GovtSupreme Courtगुजरात सरकारबिल्किस बानोसर्वोच्च न्यायालयसामूहिक बलात्कार
Previous Post

मुंबई मनपातील भ्रष्टाचाराची चौकशी, फडणवीसांच्या घोषणेचे उपाध्येंकडून स्वागत

Next Post

राज्यात १८८७ नवे रुग्ण, २१९० बरे! मुंबई ८३८, नाशिक २१, नागपूर ८ नवे रुग्ण !!

Next Post
mcr maharashtra corona report

राज्यात १८८७ नवे रुग्ण, २१९० बरे! मुंबई ८३८, नाशिक २१, नागपूर ८ नवे रुग्ण !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!