गौरव साळी
जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील प्रसिध्द जांबसमर्थ येथील राममंदिरातून पंचधातूंच्या ६ मूर्ती चोरीला गेल्या आहेत. काल मध्यरात्रीच्या सुमारास चोरी झालेली ही घटना आज सकाळी उघडकीस येताच गावकऱ्यांनी घनसावंगी पोलिसांना माहिती दिली. घनसावंगी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी करून पंचनामा केला.मध्यरात्रीच्या दरम्यान या मूर्ती चोरीला गेल्याची शक्यता आहे.त्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवणे सुरू केले आहेत.
घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथे समर्थ रामदास स्वामींच्या जन्म ठिकाणी असलेल्या राम मंदिरातील हजारो वर्षांपूर्वीच्या मुर्त्याच आज पहाटे चोरट्यांनी चोरून आहेत.या घटनेमुळे परिसरातील भाविकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. समर्थ रामदास स्वामी महाराज यांनी सुमारे १५३५ मध्ये या मूर्तीची स्थापना केली होती. पंचधातूमध्ये असलेल्या या मूर्ती आजही सुस्थितीत आहेत.
काल रात्री मंदिर बंद झाल्यानंतर मंदिरातून मूर्त्यांची चोरी झाली असूनराम लक्ष्मण सीता आणि पंचायतन असा पुरातन,अमूल्य ठेवा चोरट्यांनी शिताफीने चोरून नेला आहे. घटनास्थळी घनसावंगीचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी धाव घेत पाहणी केली आहे.
अमूल्य व साऱ्या गावचे,महाराष्ट्रातील तमाम भाविकांचे स्थान असलेल्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिरातील चोरी शोधून काढण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.